सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र मेश्राम यांना लेक लाडकी अभियानाचा भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार


मा.किशोरीताई पेडणेकर मा.महापौर मुंबई महानगरपालिका यांची प्रमुख उपस्थिती
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2024-04-02
   

पालघर : सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र मेश्राम यांनी केलेल्या व करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित मुंबई येथे मुबई मराठी पत्रकार संघ हॉल आझाद मैदान सीएसएमटी मुंबई येथे भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२४ मा.किशोरीताई पेडणेकर (मुंबई महापौर महानगरपालिका) यांच्या हस्ते तिरंगा पट्टा,सन्मानचिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.त्याच प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक,शैक्षणिक,कला क्रीडा,आरोग्यिक अश्या अनेक उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुण गौरव सत्कार मुंबई येथील मुंबई मराठी पत्रकार संघ हॉल येथे करण्यात आला.सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुन आणि नुकतेच निधन झालेल्या अभिनेत्री राजश्री काळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.त्या नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक मा.किशोरीताई पेडणेकर (मा.महापौर मुंबई महानगरपालिका),समारंभ अध्यक्ष मा.चारुशीला देशमुख (संस्थापक अध्यक्ष , कै.शिवाजीराव देशमुख सामाजिक व शैक्षणिक संस्था), मा.डॉ.मोनिका चोप्रा - जगताप (निमंत्रक  लेक लाडकी अभियान मुंबई), मा.स्वाती ओक (प्रसिद्ध स्वंदर्यातज्ञ), मा.स्वाती घोसाळकर (उपाध्यक्ष मराठी पत्रकार संघ मुंबई व पत्रकार), मा.संगीताताई गुरव (समाजसेविका व उद्योजिका),जकिर खान (अभिनेता व कॉमेडियन),दीपक कळींगण (अध्यक्ष महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ),विजय भोसले (संपर्क प्रमुख शिव शंभू संघटना),देवानंद कांबळे (उपाध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ),आणि कार्यक्रम संयोजक सूरज भोईर (लेक लाडकी अभियान,मुंबई सामाजिक कार्यकर्ता,पत्रकार व गायक या सर्वांचे कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य राहिले. सामाजिक कार्यकर्ता व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख देवेंद्र मेश्राम यांनी लेक लाडकी अभियान अंतर्गत "भारत राष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२४" स्वीकारून सर्व प्रमुख पाहुणे तसेच कार्यक्रम आयोजक सूरज भोईर यांचे आभार मानले.

    Post Views:  212


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व