ज्येष्ठांनी गुंतवणूक करताना सुरक्षितता आणि मिळणारा परतावा याला प्राधान्य देणे गरजेचे - सी.ए. साकेत राठी


ज्येष्ठ नागरिक संघाची पाक्षिक सभा उत्साहात संपन्न
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Nov 2022, 8:54 AM
   

ज्येष्ठांनी स्वकष्टाने अर्जित केलेल्या संपत्तीच्या गुंतवणुकीचे नियोजन करताना पैशाची सुरक्षितता आणि त्यापासून मिळणारा परतावा तसेच भविष्यातील त्यांच्या गरजा यांना प्राधान्य द्यावे म्हणजे जीवनातील उत्तरार्ध आनंदात जाईल असे विचार अकोल्यातील सुप्रसिद्ध गुंतवणूक व कर सल्लागार आणि सनदी लेखापाल सीए साकेत राजेंद्रजी राठी यांनी जेष्ठ नागरिक संघाच्या पाक्षिक सभेत प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून बोलताना व्यक्त केले
ज्येष्ठ नागरिक संघाची नोव्हेंबर महिन्याची द्वितीय पाक्षिक सभा बीआर हायस्कूल प्रांगणात सभागृहात उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी तर प्रमुख अतिथी  आणि मार्गदर्शक म्हणून सीए साकेत राठी हे होते मंचावर उपाध्यक्ष प्रकाश शेगोकार सचिव प्रा डॉ सत्यनारायण बाहेती कोषाध्यक्ष अशोक शिंदे उपस्थित होते.

सभेचा प्रारंभ खरा तो एकची धर्म ही प्रार्थना श्रीमती शोभा मांजरे आणि चंद्रप्रभा चौधरी यांच्या गायनाने झाली प्रमुख अतिथी साकेत राठी यांचे स्वागत पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक संघाचे सचिव डॉ सत्यनारायण बाहेती यांनी केले  यानंतर सभेमध्ये उपस्थित सदस्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात ज्यांचे वाढदिवस होते त्यांचा तसेच नवीन सदस्यांचा सत्कार करण्यात आला मला काही सांगायचं यामध्ये श्री प्रकाश जोशी दत्तात्रय खताळ प्रा यादव वक्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर म्हैसूर येथे झालेल्या अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महासंघाचे राष्ट्रीय अधिवेशनाचा वृत्तांत त्यात सहभागी झालेल्या प्रतिनिधी श्रीमती संध्या संगवई यांनी कथन केला. 
प्रमुख अतिथी साकेत राठी यांनी ज्येष्ठांनी करावयाचे आर्थिक नियोजन या विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन केले त्यांनी गुंतवणुकीचे विविध पैलू पर्याय त्यांची तुलनात्मक माहिती ज्यामध्ये गुंतवणुकीची सुरक्षितता आयकर बचत कमी वेळेत जास्त परतावा योग्य पर्यायाची निवड कशी करावी भविष्यातील आपल्या आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या गरजा वेळोवेळी बदल होणारे शासकीय आर्थिक धोरण आदीबाबत सविस्तर आणि अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले तसेच सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली. सभेचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी संघाचे जेष्ठ सदस्य दत्तात्रय खताळ यांनी संपादित केलेले पुस्तक अकोला दर्शन हे सर्व सदस्यांना स्नेहभेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सचिव डॉ सत्यनारायण बाहेती तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी केले श्रीमती संध्या संघवइ आणि शकुन परांजपे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाला संघाचे जेष्ठ सदस्य अशोक कुलकर्णी जी एस सेठी नवल टावरी डॉ देवकिसन बाहेती प्रमोद मुळे प्रभाकर देशपांडे एम एस मानकर नरेंद्र आढाव सुरेश कुलकर्णी सुशीला व जितेंद्र कुरळकर दिनेश अग्रवाल कांताबाई धनभर सौ वंदना राव निर्मला पाटील  उषा बपोरीकर राजेश्वर मुंजे आधी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Post Views:  142


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व