श्री शिवाजी विद्यालय निंबा येथे शिक्षक दिन साजरा
स्व.मुकूंदराव देशमुख स्मृती प्रित्यर्थ ३ आदर्श शिक्षक पुरस्कार
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 Sep 2024, 10:27 AM
निंबा - निंबा येथील श्री शिवाजी विद्यालयात ५ स्पेंसर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती तसेच शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
निंबा गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा पोलीस पाटील माननीय श्री प्रमोदजी देशमुख यांच्या संकल्पनेतून तथा निंबा गाव आयोजन समिती प्रमुख म्हणून त्यांनी सर्व शिक्षकांचा सन्मान व आपले परमपूज्य वडील स्वर्गीय मुकुंदरावजी गोंडुबापू देशमुख यांचे स्मृती प्रित्यर्थ तीन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करणे या हेतूने आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन, डॉ. पंजाबराव देशमुख, स्वर्गीय श्रीधर रावजी देशमुख स्वर्गीय मुकुंदरावजी देशमुख यांचे प्रतिमांचे पूजन व हारार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय संतोषजी देशमुख माजी पोलीस पाटील निंबा यांनी सादर करून कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा थोडक्यात विषद केली. यानंतर गावचे प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक माननीय श्री रामदासजी खोट्टे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आयोजकांची संकल्पना स्पष्ट करून त्यांनी श्रीधरराव देशमुख आणि मुकुंदरावजी देशमुख यांनी कशाप्रकारे समाजाच्या व गावच्या हिताची कामे केली आणि म्हणूनच आपण त्यांच्या स्मृती जपणे आवश्यक आहे याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर गावचे प्रतिष्ठित नागरिक तसेच निंबा गावचे माजी सरपंच श्री श्रीकृष्णजी मोरखडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आजच्या कार्यक्रमातून कोणता संकल्प करायचा याविषयी उद्बोधन केले.
यामध्ये प्राथमिक विभागातून आदर्श शिक्षक माननीय श्री राजेशजी तायडे सर माध्यमिक विभागातून आदर्श शिक्षक कुमारी सुधा बाळसराफ मॅडम आणि जुनियर कॉलेज विभागातून श्री नितीन पाटील सर यांना व्यासपीठावरील मान्यवर तथा निंबा गावचे ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते स्वर्गीय मुकुंदरावजी गोंडूबापू देशमुख यांचे स्मृती प्रित्यर्थ आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांना हार व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.त्याचबरोबर विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक माननीय श्री भारसाकळ सर तसेच विद्यालयाचे माननीय पर्यवेक्षक श्री खंडारे सर यांचा सुद्धा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर विद्यालयातील सर्व शिक्षकांना पुष्प देऊन त्यांचा सुद्धा शिक्षक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देत श्री राजेशजी तायडे सर कुमारी सुधा बाळसराफ मॅडम व श्री नितीन पाटील सर यांनी आपल्या सन्मानाप्रती कृतज्ञ भावना व्यक्त केल्या आणि यापुढेही अधिक उत्साहाने व जबाबदारीने कामे पार पाडून आपले कर्तव्य करू असे विचार त्यांनी व्यक्त केले.
यानंतर माझी शिक्षक तथा निंबा गावचे ज्येष्ठ नागरिक श्री नानासाहेब तायडे सर यांनी शिक्षकांना अभिनंदन पर आपले विचार व्यक्त केले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे शाळा तपासणी अधिकारी तथा माजी मुख्याध्यापक माननीय श्री विखे सर यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय श्री. भारसाकळ सर मुख्याध्यापक श्री. शिवाजी विद्यालय निंबा यांनी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा गुणगौरव केला व शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री शिवाजी विद्यालय निंबाचे मुख्याध्यापक माननीय श्री भारसाकळ सर यांनी भुषवले. प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे शाळा तपासणी अधिकारी माननीय श्री विखे सर तसेच पोलीस पाटील माननीय श्री प्रमोदजी देशमुख, सरपंच माननीय सौ ज्योतीताई सोनोने, उपसरपंच माननीय सौ अंजलीताई तायडे, तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री निरंजनजी तायडे तसेच निंबा गावचे प्रतिष्ठित नागरिक यांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुधा बाळसराफ मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्री अनिल बढे सर यांनी केले. अशाप्रकारे श्री. शिवाजी विद्यालय, निंबा येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
Post Views: 332