माणसा दगडात देव शोधू नको
अरे देव माणसातच आहे
बुद्ध ,तुकोबा ,दाभोळकरांच्या विचारातच बघ देव वसतो आहे
माणसा बुवाबाजींच्या साथीने
पाहू नको तुझे हातात तू भविष्य
शिवराय, भीमराय आठव
तुझ्याच मनगटात दडले आहेआयुष्य
माणसा जिजाऊ,सावित्रीच्या लेकीला
वंशाच्या दिव्यापायी मारू नको गर्भात
तुझे अन मनवजातीचे अस्तित्व
निर्मितीचे स्त्रीमुळेच आहे विश्वात
बंदुकीच्या गोळीपेक्षा विवेकाची
ताकत बुद्धीनेच जास्त आहे
संपवले दाभोळकर ,पानसरे
विचार अजून जिवंत आहे
धर्माच्या भिंती तोडून टाक
धर्म अन जात तुझे संविधान आहे
नको भांडू रंगारांगांच्या झेंड्यासाठी
हितासाठी एकतेचाच तिरंगा आहे
माणसाला माणूस समज
जात ,रुढींचे भले मोठे खड्डे पडलेले
बुजवण्यातच साऱ्या जगताचे कल्याण आहे दडलेले
थोड्या अमिश्यासाठी मत तुझे विकू नकोस
लोकाधिकार तुझा हक्क स्वातंत्र्याचा
घटनेच्या कलमांचा वापर करून
योग्य नेता निवड तुझ्या हिताचा
करा हिंसेला नकार ,करा मानवतेचा स्वीकार
अनिता देशमुख
नांदुरा(बुलढाणा)
हमू.--कल्याण
Post Views: 206