जि प प्राथमिक शाळा सरेवाडी जल्लोषात सुरू
दि.१५ जून रोजी सरेवाडीची जि.प.शाळा जल्लोषात सुरू झाली.शाळेच्या पहिल्या दिवसात सर्व विध्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व नवीन पुस्तके वाटप करण्यात आली.
इयत्ता 1 ली च्या मुलांसाठी प्रवेश मेळावा क्रमांक 2 आयोजित करण्यात आला होता.पालक व ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला
शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्वांना गणवेश वाटप सुध्दा करण्यात आले.
सर्व कार्यक्रम छान होत असताना खाण्यासाठी सुद्धा गोडधोड असावे म्हणून शाळेच्या वतीने सर्वांना मोतीचूरचे लाडू पोषण आहारासोबत देण्यात आले.
कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय ठोकळ, नायफडचे पोलीस पाटील विनायक ठोकळ, अंगणवाडी ताई सुलाबाई ठोकळ, सुवर्णा ठोकळ,संगिता ठोकळ व मुख्या. बापूराव दराडे आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विजयकुमार शेटे यांनी केले.
Post Views: 197