नागपुर येथील उत्तम किडस कॉन्व्हेंटचे स्नेहसंम्मेलनातसाहित्यिक पंजाबराव वर ज्ञान-ज्योती पुरस्काराने सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2024-02-04
   

अकोला : नागपुर येथील  उत्कर्ष ज्ञानविकास बहुउद्देशिय संस्थे अंतर्गत चालविण्यात येणा-या उत्तम किडस कॉन्व्हेंटचे स्नेहसंमेलन २६ जानेवारी २०२४ रोजीच्या नागपुर येथील स्नेहसंमेलन कार्यक्रमात अकोल्याचे साहित्यिक तथा व्हाईस ऑफ मिडीयाचे (सा.विं.) जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांना त्यांच्या साहित्यिक तथा पत्रकारितेच्या कार्याबद्दल त्यांनाा ज्ञान-ज्योती पुरस्काराने मोमेंटो, शाल व पुष्पहार देऊन सन्मानित केले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जे. यु. भगत साहेब, सरपंच नानाभाऊ लापकाळे, संस्थेच्या प्रिन्सीपॉल बगडे मॅडम, माजी शिक्षण सभापती सौ. वंदनाताई मुडे, माजी जि.प. सदस्य सुजीत भाऊ नितनवरे, नागलवाडीच्या सरपंचा  हिराबाई सहारे, लावा येथील सरपंचा ज्योत्सनाताई नितनवरे, उपसरपंच जितेंद्र चवरे, माजी उपसरपंच महादेव मांदाळे, प्रवीणभाऊ डाखोरे, रजनी भगत, कविता मांडाळे, कल्पना मेश्राम, अश्वीनी भोंबले ढगे मॅडम, बगडते साहेब, वनिता सहारे आदींची उपस्थिती होती. पंजाबराव वर यांनी महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रातून सतत समाजउपयोगी लिखााण करीत असतात, तसेच सामाजिक कार्यासोबतच  त्यांची महानायक बिरसा मुंडा, यांची चरीत्र गाथा,  गाथा रमाईची (जिवन चरीत्र), व-हाडी झटका (काव्यसंग्रह), भु्रण कन्येचा टाहो (प्रातिनिधीक काव्यसंग्रह) प्रकाशित आहेत. त्यांच्या कार्याची दखल म्हणून नागपूर येथे त्यांना ‘ज्ञान-ज्योती’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

    Post Views:  138


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व