स्व.विरेंद्र शिवचरण मेश्राम यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त आधार सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजू महिलांना साड्यांचे वाटप...


 देवेंद्र मेश्राम  2023-09-17
   

पालघर : - 
 आधार सेवाभावी संस्था  आपले मानवाधिकार फाऊंडेशन संचालित.. च्या वतीने स्व.विरेंद्र शिवचरण मेश्राम यांची चौथी पुण्यतिथी व भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आशादीप विद्यालय महावीर नगर धनानी नगर बोईसर येथे शनिवार दिनांक 16 सप्टेंबर  2023 रोजी दुपारी 01 .00 वाजता अतिशय आनंदात सुरू करण्यात आला.

 खरं तर ही पुण्यतिथी 13 सप्टेंबर रोजी होती पण काही कारणास्तव पुढे घेण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्व.विरेंद्र मेश्राम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.त्या नंतर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले 
मेजर बाबू बजगुडे बोईसर पोलिस स्टेशन,
मेजर संदीप मासरे बोईसर पोलिस स्टेशन, डॉ.संतोष संगारे मानव सेवा हॉस्पिटल, Advocate  हेमंत पाटील नोटरी,विलास भोणे क्रांतिज्योती दिव्यांग सेवा संस्था ,
के सी एन क्लब चे राष्ट्रीय अध्यक्ष नंदन मिश्रा त्यागी जी,के सी एन क्लब चे विक्रम शुक्ला,आशादिप विद्यालय चे मुख्यद्यापक हरिओम शरण मिश्रा जी
आमचे वरिष्ठ पत्रकार मित्र जे पी करोतिया, ओमप्रकाश द्विवेदी,अजित सिंह या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

आणि त्या नंतर पाहुण्यांच्या उपस्थितीत पाहुण्यांच्या हस्ते गरजू महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.तसेच सामाजिक कार्यकर्ता आणि आपले मानवाधिकार फाऊंडेशन संचालित ..आधार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र शिवचरण मेश्राम यांनी आपल्या भावाची चौथी पुण्यतिथी गरजू महिलांना साड्यांचे वाटप करून साजरी केली . व त्यांच्या कडून आपल्या भावाला दर वर्षी असेच गरजूंना मदत करून देवेंद्र मेश्राम आपल्या भावाला या स्वरूपात वाहिलेली श्रद्धांजली असते. त्त्यानंतर सर्वांना चहा नासत्या ची वेवस्था करण्यात आली होती .या वेळी घरातील सर्व मंडळी उपस्थित होती. छाया मेश्राम,जितेंद्र मेश्राम,वनिता मेश्राम, नितेंद्र मेश्राम, सुनयना मेश्राम, धिरेंद्र मेश्राम, सिंग,शुभम चोऊबे , के सी एन क्लब चे चंदन झा,राकेश शर्मा,शंकर सिंह शेखावत त्याच प्रमाणे अनेक गणमान्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन के सी एन क्लब चे राष्ट्रीय अध्यक्ष नंदन मिश्रा त्यागी यांनी केले.

    Post Views:  197


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व