स्वाभिमानीचे पीक विमा कार्यालयात ठिय्या आंदोलन


कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Dec 2022, 8:49 AM
   

अकोला-खरीप हंगामात शेती पिकांचा शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याची तुटपुंजी रक्कम मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वात शहरातील पीक विमा कार्यालयात ठिय्या आंदोलन शुक्रवार ता.२ रोजी करण्यात आले.
आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीकडून देण्यात आलेली रक्कम अत्यंत तुटपुंजी असून आणि पोस्ट हार्वेस्टिंगचा सर्व्हे सुद्धा करण्यात आला नसल्याने, स्वाभिमानी शेतकरी पक्षाने शेतकऱ्यांसह आयसीआयसीआय लोंबार्ड पीक विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पोस्ट हार्वेस्टिंग सर्व्हे न झाल्याच्या तक्रारी नंतर शेतकऱ्यांना कंपनीने मेसेज पाठवले मात्र सर्व्हे करायला कंपनीचा एकही माणूस शेतात फिरकला नाही.अशा प्रकारची वागणूक देऊन विमा कंपनी एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टाच करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून करण्यात येत आहे.आंदोलनात रामहरी आगळे, केशव लळे  मंगेश भातुलकर,  शेख मुख्तार , शेख मोशीन, शुभम राऊत, हरी पाटील, राहुल सरदार आदी सहभागी झाले होते.

    Post Views:  220


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व