शरद पवार मार्ग काढतील : जयंत पाटील


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  23 Jun 2022, 9:36 PM
   

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतरचा तिढा आज तिसर्‍या दिवशीदेखील वाढतच चाललेला आहे, गुरुवारी दिवसभर यासंदर्भात तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू होत्या. यासंदभात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यातून मार्ग काढतील असा विश्वास व्यक्त केला आहे. 
अशा प्रकारच्या आणीबाणीच्या परिस्थितीतून शरद पवार नेहमीच मार्ग काढत आले आहेत. आज आमदार ब्लॅक कॅट कमांडोंच्या घेरावात अडकले आहेत. एका हॉटेलमध्ये किल्ल्याचे स्वरूप करून तिथे त्यांना ठेवले आहे. जेव्हा हे आमदार मुंबईत येतील आणि उद्धव ठाकरेंसमोर जातील, तेव्हा हे चित्र बदलेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 
शिवसेना आमदारांचा एक मोठा गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली फुटून बाहेर निघण्याच्या तयारीत असताना त्यामुळे राज्य सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार वाचवण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. गुरुवारी दिवसभर यासंदर्भात तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यात नेमकं काय घडणार आहे? याविषयी सध्या संभ्रमावस्था असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपाकडून कुणीही भूमिका मांडलेली नाही
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पाठीमागे भाजपा असल्याचा तर्क लावला जात असताना त्यासंदर्भात भाजपाकडून भूमिका मांडण्यात आलेली नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. भाजपाच्या भूमिकेविषयी त्यांच्यापैकी कुणीही काही भाष्य केलेले नाही. एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना घेऊन तिथे जाऊन राहिले आहेत याच्यापेक्षा जास्त त्यात काही नाही. पडद्यामागच्या गोष्टींमध्ये जाण्याचे कारण नाही. जाताना कुणी विमाने दिली? येताना कुणी विमाने दिली? ते कुठल्या हॉटेलमध्ये राहिले? हॉटेलची बिलं कुणी दिली? कोण त्यांना पोसतोय? याच्याविषयी आज बोलण्याची गरज वाटत नाही, असे पाटील म्हणाले. 

    Post Views:  189


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व