अल्पसंख्यांक संस्थांची एसआयटी मार्फत चौकशी करा!
पातुरातील केजीएन शाळेच्या शिक्षिकेची मुख्यमंत्र्याकडे तक्रार
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
16 Apr 2025, 10:53 AM
अकोला : पातूर येथील सय्यद कामरोद्दीन सय्यद इस्माईल यांच्या महात्मा गांधी एजुकेशन सोसायटी ,शाहबाबू क्रीडा मंडळ ,ग्रामीण शिक्षण मंडळ या तिन्ही संस्थांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी शिक्षिका नुजहत फरहीन शेख कय्युम यांनी १३ एप्रिल २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शिक्षिका नुजहत फरहीन शेख कय्युम ह्या पातूर येथील केजीएन उर्दू शाळेवर कार्यरत असताना, आर्थिक व्यवहारामुळे तिला संस्था सचिव सय्यद कामरोद्दीन यांनी त्यांना २०२३ मध्ये निलंबित केले होते.निलंबित झालेल्या शिक्षिकेसह इतर शिक्षकांनी शाळेचे सचिव यांच्याकडून आर्थिक व्यवहार ,शरीर सुखाची मागणी ,जीवे मारण्याची धमकी ,आदी बाबतच्या तक्रारी अल्पसंख्यांक अयोग प्यारे खान यांच्याकडे करण्यात आल्या होत्या, सदर तक्रारीची दखल घेत प्यारे खान यांनी दोन महिन्यापूर्वी सय्यद कामरोद्दीन यांच्या पातुरातील केजीएन,सलीम जकारिया, गफ्फारीया ,या तिन्ही उर्दू अल्पसंख्याक शाळेत भेट दिली असता,एकाच जागेमध्ये दोन वेगवेगळ्या नावाने शाळा सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता .त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश अल्पसंख्यांक अयोगाचे प्यारे खान यांनी दिले होते.परंतु संबंधित अधिकाऱ्याकडून अद्यापही कारवाई करण्यात आली नाही.कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने तिन्ही अल्पसंख्यांक संस्थांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यासाठी शिक्षिका नुजहत फरहीन यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊन चौकशीची मागणी केली आहे.
अल्पसंख्याक आयोग आक्रमक : कारवाईला सुरुवात
संस्था सचिव सय्यद कामरोद्दीन यांच्या तीन शाळेवर अल्पसंख्याक आयोगाचे प्यारे खान यांनी दिलेल्या भेटी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्याने त्यांनी कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेऊन प्रकरण उघडकीस आणले, आणि त्यांच्या शिफारशीवरून मुख्यमंत्र्यानी दखल घेत अल्पसंख्याक संस्थांमधील अनियमितताची चौकशी करण्याचे आदेश संबंधित शिक्षण विभागाला दिले आहे.
Post Views: 87