अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून‌ बाळापूर प्रकरणातील पिडीत मुलगी आणि आरोपीचा शोध


आतापर्यंत एकून १०९ गुन्ह्यांचा तपास पूर्ण
 vishwaprabhat  05 Dec 2023, 6:18 PM
   

अकोला - अकोला पोलिस विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून पोलिस स्टेशन बाळापूर येथील  अप.क्र. २९ /२०२३ का ३६३ भादंवी गुन्ह्यांच्या चौकशी प्रकरणातील पिडीत मुलगी आणि आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश मिळविले आहे.त्यांना देऊळगाव साकर्शा येथून घेऊन बाळापूर पोलिसांच्या सूपूर्द करण्यात आले आहे.
          अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने आता पर्यंत भादंवी च्या ३६३ (अ ) आणि ३६६ मधील महिला व बाल अत्त्याचार संदर्भातील १०९ गुन्ह्यांचा शोध‌ लावला असून यामध्ये ७६ गुन्हे व ३३ प्रकरणे हरविल्याची होती.
      सदर कार्यवाही अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक श्री संदिप घुगे ,अप्पर पोलिस अधीक्षक श्री अभय डोंगरे व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सुभाष दुधगावकर,शहर विभाग,अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक  श्री विजय खर्चे, पोहेकॉ सुरज मंगरूळकर, धनराज चव्हाण, मपओकॉ पूनम बचे, पओकॉ अविन्द्र खोडे, वाहन चालक पओकॉ विकास सावे यांनी पार पाडली.अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून आणखी अनेक प्रकरणातील पिडीत मुली आणि आरोपींचे कसून शोध घेण्यात येत आहेत.

    Post Views:  311


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व