अकोला : शहरातील गणेशविसर्जन मिरवणुका व उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विसर्जन मार्गाची पाहणी आज केली. पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधिक्षक, विविध पोलीस, महसूल महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जयहिंद चौक, आगर वेस, लहान दगडी पुल, मोहम्मद अली चौक, गांधी रोड, सिटी कोतवाली चौक, गणेश घाट आदी ठिकाणांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. रस्ते दुरुस्तीचे तत्काळ पूर्ण करावे. रस्त्यातील वीजेच्या तारा सुरक्षित उंचीवर न्याव्यात. रस्त्यावरील अतिक्रमणे तत्काळ हटवावीत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
Post Views: 229
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay