मुंबई - राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीबाबत शासनाने मान्यता दिली आहे. या बातमीनंतर तीन दिवसांतच शिक्षण विभागाने शिक्षक भरती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या शिक्षक भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती बाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल, असेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
समांतर आरक्षणातील भरतीलाही परवानगी
- समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रुपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे.
- समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी पत्रकात म्हटले आहे.
Post Views: 224
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay