देशमुख समाजातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन
माहिती पाठविण्याचे आवाहन...!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
24 Jun 2023, 8:32 AM
अकोला - शैक्षणिक पात्रतेचे उंबरठे ओलांडत भावी आयुष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या समाजातील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक होणे क्रमप्राप्त असते. म्हणून अशा विद्यार्थ्यांना आयुष्याच्या वाटचालीत पुढे जातांना सकारात्मक प्रोत्साहनाचे बळ प्राप्त व्हावे म्हणून देशमुख समाजातील १० वी व १२ मधील गुणवत्ताप्राप्त,त्याचप्रमाणे एम.पी एस.सी व यु.पी. एस.सी.मधून यशस्वी होऊन निवड झालेल्या विद्यार्थांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येत आहे.
अकोला जिल्हा देशमुख समाजसेवा मंडळाच्या वतीने व देशमुख महिला मंडळ व देशमुख समाज जागृती मंडळ,अकोला यांच्या संयुक्त सहकार्यांने अकोला जिल्ह्यातील देशमुख समाजातील १० वी आणि १२ वी मध्ये ८० टक्के आणि त्यापुढील गुणानुक्रमाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.तरी देशमुख समाजातील पालकांनी आपल्या पाल्ल्यांच्या नावांची पूर्वनोंदणी करण्यासाठी त्यांची गुणपत्रिका,एक पासपोर्ट फोटो व मोबाईल नंबर आणि संपूर्ण पत्त्यासह आपली माहिती .......
१) सौ.राजश्रीताई देशमुख, हॉटेल सेन्टर प्लाझा,केडीया प्लॉट,अकोला
(मोबा.क्र.९९२१३२८९२०)
२) श्रीमती कविताताई ढोरे,
ई- बर्ड इंटरनेट कॅफे,गजानन महाराज मंदिराजवळ,सहकार नगर,अकोला.
(मोबा.क्र.९८२२८०४५०५)
३) हरिष देशमुख,
छाया मेडीकल,छाया हॉस्पिटल,डाबकी रोड,अकोला(मोबा.क्र९८२२५१७५३३) या ठिकाणी दि.२५ पर्यंत समक्ष जमा करावी.
पोस्टाने पाठवायची असल्यास
४) श्री.के.व्ही.देशमुख,
कृष्णशोभा,अंबिका नगर,डाबकी रोड,अकोला.(मोबा.क्र.९४२२८८२७७७) याठिकाणी पोस्टाद्वारे रविवार दि.३० जून २०२३ पर्यंत पोहचेल या बेताने पाठवावी.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात हा कार्यक्रम राहणार असून त्याची तारीख,वेळ आणि स्थळ नंतर कळविण्यात येईल किंवा वेळे अभावी सोशल मिडीया व वृत्तपत्रातून जाहिर करण्यात येईल.यासाठी दि.३० जून नंतर आलेली माहिती,तसेच व्हाटस् अॕपवरून पाठविलेली माहिती स्वीकारली जाणार नाही. पूर्वनोंदणी करणेच आवश्यक राहील.वेळेवर येणाऱ्या कोणालाही या सत्कार समारंभात सहभागी करता येणार नाही. या शिस्तीचे पालन सर्वांना बंधनकारक राहील.
देशमुख समाजाकडून आयोजित या कौतुक सोहळ्यात जास्तीत जास्त समाजबांधवांनी आपल्या गुणवत्ताप्राप्त मुला मुलींना सहभागी करावे असे आवाहन पूर्वनियोजन सभेत उपस्थित असणारांपैकी व पदाधिकारी , अकोला जिल्हा देशमुख समाज मंडळ अध्यक्ष संजय एम.देशमुख,निंबेकर, उपाध्यक्ष के.व्ही देशमुख, डोंगरगावकर, वसंतराव देशमुख, सौ.कल्पनाताई देशमुख सचिव अश्विन देशमुख, महिला मंडळ अध्यक्षा सौ.राजश्री देशमुख, संजय देशमुख कंझारेकर प्रा.संजय देशमुख, सचिव नितीन देशमुख व तिनही मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Post Views: 145