अकोला जिल्हातील त्रुटी मधील २०%,४०%,६०% शाळांना वाढीव टप्पा मिळवण्याबाबत पाठपुरावा


महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनविस यांना निवेदन
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  19 Jun 2023, 10:21 AM
   

अकोला : आज अकोला जिल्हातील २०% ,४०% व ६०% अनुदानास पात्र असलेल्या मात्र जाचक अटी व शर्ती मुळे अपात्र ठरवलेल्या शाळांच्या समस्यांबाबत अमरावती विभागाचे माजी पदवीधर आमदार तथा विना अनुदानित शाळाकरीताचे संकटमोचक,दैवत राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मा.डॉ.श्री.रणजीतजी पाटील साहेब यांची भेट घेऊन अकोला जिल्ह्यातील घोषित पात्र शाळा व  टप्पावाढ अंशतःअनुदानित शाळा यांना शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालय अकोला द्वारे पोस्टाने  मिळालेल्या 90% अपात्र असलेल्या   शाळांच्या टप्पावाढीचा गुंता सोडविण्या करिता डॉ रंजितजी पाटील साहेबांचे सोबत संघटनेचे विदर्भ संघटक बाळकृष्ण गावंडे व महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री मनिषजी गावंडे  याच्या मार्गदर्शना खाली संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री अल्केश खेंडकर, आम्हा दोघांना विमानतळावर सोबत नेऊन उपमुख्यमंत्री महोदयांना स्वहस्ते निवेदन देण्याची संधी उपलब्ध करून दिली, परत डॉ साहेबांचे घरी पुन्हा उपमुख्यमंत्री महोदयांसोबत डॉ रणजित पाटील साहेबांनी चर्चा केली तेव्हा सुद्धा आम्ही दोघे तेथे उपस्थित होतो.

    Post Views:  213


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व