मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या प्रकल्पतील भ्रष्टाचार प्रकरण
पंचनाम्यात आवश्यक उल्लेख नसताना ही पावडे कुटुंबीयांना २,६५,४०,९४०/.मोबदला कोणत्या आधारे किंवा कोणाच्
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
23 May 2023, 6:18 PM
संतोष घरत (बोईसर) : मौजे किराट तालुका- जिल्हा पालघर येथील गट क्रमांक ३३५ , ३३८ व ३६३ ह्या संपादित जागेची फेर मोजणी करिता भूमी अभिलेख पालघर ह्यांना पत्र प्राप्त झाले.त्यानंतर ९ सप्टेंबर २०२० रोजी त्या जागेवर जाऊन अर्जदाराने दाखविल्याप्रमाणे भू अभिलेख पालघरच्या अधिकारी अवनी घरत यांनी पंचनामा करताना पंचनाम्या मध्ये कुठेही घराचा उल्लेख नसताना, वास्तवात पत्र्याचे घर असताना ते आरसीसी दाखवून, संतोष पावडे व त्याचे कुटुंबीयांनी शासनाची व अधिकाऱ्याची दिशाभूल करून अनेक कोटी रुपयांचे भ्रष्टाचार केल्याचे सर्व स्तरावरून बोलले जात आहे.
शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष विश्राम पावडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय पालघर यांची दिशाभूल करून तसेच खोटी व बोगस माहिती पुरवून वीट बांधकाम ,पत्रे स्वरुपाची दोन राहती घरे (घर क्र. ३६८ आणि घर क्र. ४०१ ) संपादित होत असल्याचे खोटे सांगितले. तसेच वीट बांधकाम पत्रे स्वरुपाची दोन राहती घरे (घर क्र. ३६८ आणि घर क्र. ४०१) ऐवजी ही घरे आर सी सी असल्याचे खोटे सांगितले. सदर घरांचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून व आर्थिक संगनमत करून वीट बांधकाम पत्रे स्वरुपाची दोन राहती (घर क्र. ३६८ आणि घर क्र. ४०१ ) घरांचे खोटे मुल्यांकन दाखले बनवले. सदर मुल्यांकन दाखले बनवताना (घर क्र. ३६८ आणि घर क्र. ४०१) हे आर सी सी असल्याचे कागदोपत्री बनावट दाखले तयार केले. आणि सदर मुल्यांकन दाखल्याच्या आधारे भूमी अभिलेख कार्यालय पालघर येथील अधिकाऱ्यांना हाताशी धरून व आर्थिक संगनमत करून भूसंपादित होत नसलेली घरे भूसंपादित होत असल्याचे कागदोपत्री दाखवले. आणि खोट्या माहितीच्या व कागदपत्राच्या आधारे तशी चुकीची व बेकायदेशीर नोंद विवरण पत्र मध्ये नमूद केली. आणि सदर घर क्र. ३६८ या घराचा एकूण ५४, १६,६९२ /- इतका मोबदला अनधिकृतपणे परस्पर पावडे यांनी घेतला .घर क्र. ३६८ हा संपादित होत नसून आजही अस्तित्वातआहे. तसेच सदर घर क्र. ४०१ या घराचा एकूण ७९,०८,५३० /- इतका मोबदला अनधिकृतपणे परस्पर स्नेहल संतोष पावडे ह्याच्या खात्यावर जमा करण्यात आला. घर क्र. ४०१ हा संपादित होत नसून आजही अस्तित्वात आहे.
तसेच मौजे किराट, ता. जि. पालघर येथील सर्व्हे नं. ३३५ (संपादित क्षेत्र ९८३५ चौरस मीटर) व ३३८ (संपादित क्षेत्र २२४४ चौरस मीटर) या क्षेत्रामध्ये अत्यंत कमी झाडे होती. सदर झाडे व वृक्ष कृषी विभाग पालघर यांच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटा व बोगस अहवाल बनविण्यात आला. सदर अहवालात अस्तित्वात नसलेली झाडे देखील दर्शविण्यात आलेली आहेत. निव्वळ शासनाचा पैसा लाटण्यासाठी सदरचे गैरकृत्य केले आहे. आणि सदरच्या गैरकृत्या अंतर्गत झाडांचा एकूण मोबदला ९५,२९,७७२ /- रुपये असा शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष संतोष विश्राम पावडे व इतर यांनी अनधिकृतपणे घेतला आहे. संतोष विश्राम पावडे हे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष त्यानी आपल्या पदाचा गैरवापर करून कृषी विभागाच्या व भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सदरचे बेकायदेशीर कृत्य केलेले आहे. असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. मौजे किराट, ता. जि. पालघर येथील सर्व्हे नं. ३३५ व ३३८ मधील भूसंपादित जमिनीच्या पंचनाम्यामध्ये घरांचा व जास्त प्रमाणात असलेल्या झाडांचा कोठेही उल्लेख नाही.
अध्यक्ष पदाच्या ताकदिवर संतोष पावडेनी शासनाची फसवणूक केल्याची तक्रार ,तक्रारदाराने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे . भूमी अभिलेख चे अधिकारी पालघर ह्यांनी दि .९ सप्टेंबर २०२०पंचनामे मध्ये उल्लेख न केलेल्या संपत्तीचा ही मोबदला कोणत्या आधारे व कसा दिला हा बिकट प्रश्न असून ह्या प्रकरणावर जिल्हाधिकारी गोविंद बोडके कोणती भूमिका बजावून ह्या प्रकरणात समाविष्ट असलेले संबंधित अधिकारी व फसवणूक करणारे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष ह्यांच्यावर कोणती कायदेशीर कारवाई करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Post Views: 228