पगारदार शिक्षकांना राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे सुविधा द्या; अन्यथा खाते राष्ट्रीयकृत बँकेत वळते करू!


राज्य शिक्षक परिषदेची जिल्हा बँकेकडे मागणी
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  29 Jul 2022, 8:40 AM
   

अकोला :  अकोला व वाशीम जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या शासनमान्य अनुदानित विद्यालय, महाविद्यालयांमधील पगारदार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी खातेदारांना राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे झिरो बॅलन्ससह प्रचलित सुविधा पुरविण्यात याव्यात, अन्यथा पगारदार कर्मचाऱ्यांचे खाते राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळते करण्या बाबत निर्णय घ्यावा लागेल असा  इशारा आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासनाला देण्यात आला. 

या निवेदनानुसार वेळोवेळी मागणी करून सुद्धा बँक शिक्षकांच्या मागण्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. बँकेने पगारदार खातेदारांना वेतनाच्या प्रमाणात ओ.डी.  मर्यादा किमान ३० लक्ष रुपये करणे, वेतन धारक खातेधारकांना असलेली सी. सी. लिमिट वाढवून किमान ५ लक्ष किंवा पाचपट करणे, सरसकट विमाकवच लागू करणे, खात्यावर लावण्यात येणारे विविध चार्जेस बंद करून झिरो बॅलन्स सुविधा पुरविणे, गृहकर्ज मर्यादा किमान ६० लाख रुपये करून व्याजदरात कपात करणे , वाहन कर्ज व्याजदर कपात करणे, गृह कर्ज आणि ओ. डी.  कर्जात टॉप अप सुविधा सुरु करणे, विना जमानतदार कर्ज तात्काळ उपलब्ध करून देणे अश्या मागण्याचे शिक्षकांच्या सह्यांचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनंतकुमार वैद्य यांना देण्यात आले व वेतनधारक खातेदारांच्या विविध मागण्यांबाबत, समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. शिक्षकांनी वेळोवेळी बँक प्रशासनाला सहकार्यच केले असून बँकेने सुद्धा पगारदार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रती अनुकूल धोरण ठेवावे बँकेने सदर मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन त्वरीत निर्णय घ्यावा अन्यथा वेतनधारक खातेदारांना दुस-या पर्यायांचा विचार करावा लागेल असा इशारा यावेळी चर्चेअंती शिक्षक परिषदेच्या वतीने बँक प्रशासनाला देण्यात आला.  यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. अतुल पिलात्रे, श्री गजानन जायभाये (जिल्हाध्यक्ष ग्रामीण), कार्यवाह प्रा. डॉ. सौरभ म्हात्रे, श्री अनंत डिवरे, सह कार्यवाह प्रा. राहुल महाजन, कोषाध्यक्ष श्री निलेश ढाकरे,  कमवी शिक्षक प्रा. अजय पालडिवाल, प्रा. आर. डी. क्षीरसागर, प्रा. संजय तिवारी, प्रा. प्रकाश गवई, प्रा. प्रशांत राठी, प्रा. रोशन चोरे, प्रा. अमोल ठाकरे, प्रा. डॉ. ए. सी. लांडे, प्रा. नांदे, प्रा गिरी, श्री एन डी माल्टे, श्री र प्र इंगळे यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व वेतनधारक शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.   

    Post Views:  229


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व