करू नका निसर्गाचा ऱ्हास वृक्षारोपण हाच असावा ध्यास
अडकू नको सुताच्या फेऱ्यात, भविष्य उजळून घे शिक्षणाच्या घेऱ्यात
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
14 Jun 2022, 5:05 PM
वड पौर्णिमा धार्मिकतेमधील हिंदू धर्मामध्ये मांडल्या जाणाऱ्या व्रता पैकी, एक भाग रूढी, परंपरा..! यांच्या फेऱ्यांमध्ये गुंतलेला हा एक अजून स्त्रीत्वाला पारतंत्र्य मध्ये नेणारा एक सण ,
आपण जर म्हटलं तर धर्मरक्षक आपल्याला आमच्या धर्मावर टीका करता.
आमच्या सणावर तुम्ही टीका करता.असे आरोप आपल्यावर लावतील .
आईविना जीवन नाही,वृक्षा विना श्वास नाही
वृक्ष तोड थांबवा मानवा,निसर्गाविना ऋतू नाही
काळापासून पुरातन काळापासून
स्त्रीवर्गाला यांचा जाचक आहे दैववादाचा पगडा हा तर नेहमी स्त्रीवरच का? विचार करण्याची बाब आहे .
आणि याचा विचार समाजातील देशातील स्त्री आणि पुरुष यांनी दोघांनी करायला हवा.
आता काही लोकांचे म्हणणे असे असेल की ही आमची धार्मिकता असून तुम्ही आम्हाला शिकवू नका विज्ञान शिकवण्याची नाही एक विज्ञानाची नित्याची बाब आहे की पुरातन काळापासून रुढी-परंपरा यामध्ये स्त्रीला काढावा लागेल का याचा थोडा तरी विचार करायला हवा ना.... असो,
आता पुरातण काळाच्या कथेमध्ये, दंतकथे मध्ये पूर्वजांनी झाडांच्या औषधी औषध उपयोग आपल्याला सांगितले .
परंतु या कथेमध्ये सावित्रीने तिच्या नवऱ्याला वडाच्या झाडाखालीच का ठेवले ? आणि त्याला त्या झाडाला धागा गुंडाळला अशी दंतकथा प्रचलित आहे .
विचार करण्याची बाब आहे की कुठल्याही पुरुषाचे आयुष्य, स्त्रीचे आयुष्य, मुलाबाळांचे, कुणाचे आयुष्य हेच झाडाला धागा बांधून किंवा व्रत करून परत येते का ही वैचारिकतेची बाब आहे .तुम्हाला जर व्रत करायचे आहेत.
तर वडाच्या झाडाच्या फांदी चे चित्र काढा, त्याचा रांगोळी काढा. आणि तुमच्या व्रताची सांगता करा. यांनी धार्मिकता भावना कायम राहिल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही .
आता एक कळत नाही नवरा आजारी पडला तर त्याचा इलाज डॉक्टर करणार का झाडाला फेऱ्या मारून करणार ? एक वैचारिकता..... ही रूढी कुणाच्या मनात आली आहे का खेद वाटतो .
ज्या सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी हाल-अपेष्टा लोकांचा त्रास सहन करून अहोरात्र प्रयत्न केले.
आणि स्त्रीला शिक्षित केले, त्या सुशिक्षित स्त्रिया त्याला बळी पडत आहेत. आणि मोठ्या प्रमाणात बळी पडतात. शिक्षण घेऊनही या असल्या प्रकारांना, प्रथांना पूर्ण चालना देत आहेत.
त्यांचेमध्ये वैचारिकत का येत नाही?
यातून बाहेर पडतच नाही. झाडाला फेऱ्या मारून धागा गुंडाळून कोणाचा जीव वाचत असतो का ? हा प्रश्न अशिक्षित महिलांना का पडत नसावा ??
गुलाबी थंडीत वेडावती मधाळ क्षण निर्सगाच्या सानिध्यात धरित्रीचे रूप खुलते कणकण विज्ञानाच्या प्रगतीने ,सुख सोयीने आपण किती लाभ घेतो असे त्यांच्या मनात काय होत नाही झाडाजवळ पाच फळे ठेवतात. मला प्रश्न पडतो की झाड तर फळ खात नसावं .
तीच फळे लहान मुलांना दिली किती खुश होतील ?? खातील त्यांना आनंद होईल आणि त्यांचा आनंद व आपल्या आपले मनाला समाधान मिळेल रस्त्याच्या वाटसरूंना परिसरातील असताना झोपडपट्टीतील लोकांना हे फळ वाटा , त्यांची पोरं थोडं तरी त्यांचा तरी पोट भरेल ना जर वाटप करणे तुमचा हेतू असेल तर मग ते कोणालाही द्या ना झाडा जवळ ठेवून महिला निघून जातात, शेवटी मूल्य देऊन खातात ना किंवा कुत्री तोंड लावत असतील!
पशु तर आता रस्त्याने दिसतच नाही. त्यामुळे तेही खाऊ शकत नाही . आणि दुसऱ्या दिवशी झाडाजवळ इतरत्र परिसरामध्ये किती कचरा पडतो या पूजेच्या प्रथेने खर्च सुद्धा होतो .
आता ज्या महिलांजवळ पैसा आहे, त्या नवीन नवीन साड्या घेऊ शकतात, दागिने घालू शकणार,आणि नटून थटून राहणार, पण काहींना हे जेवण सुद्धा धड मिळत नाही त्यांचा उदरनिर्वाह त्यांचे नवरे त्यांचे पती किंवा मुलं किंवा त्या स्वतःदिवसभर कष्ट करून त्यांना पैसा मिळू त्या रात्री दिवसभर काम करून संध्याकाळी जेवणाची सोय करत असतील त्यांनी मग काय करावे?? त्यांनी व्रत करू नये त्यांच्या मनाला हे प्रश्न पडत असतील ना! त्यांच्या पतीचे आयुष्यात साठी त्यांनी व्रत पूजा करावी का?? करू नये आणि हे जर केले नाही तर मग काय त्यांच्या नवऱ्याचा आयुष्य वाढणार नाही.?? व्रत करून वडाला फेर्या मारून आयुष्य वाढते ही कल्पनाच मुळात किती खेददायक आहे . काय याचा विचार स्वतः स्त्रियांनी करावा - तशी ही आजकालची तरुण पिढी या वृक्षांना महत्व देत नाही पण घरच्या स्त्रिया यांच्या सांगण्यानुसार त्यांच्या इच्छा नसूनही त्यांना हे व्रत करावे लागते .
त्यांना या प्रथेला बळी पडावे लागते. स्त्रीला या जाचक बंधनात बघा कसे अडकवून ठेवले आहेत. वडाचे झाड हे डेरेदार असते त्याचे औषधी गुण हे शास्त्रीय दृष्टीने सिद्ध झाले आहेत, मधुमेह, केसांचे वाढणे, त्वचेचे विकार, हृदयविकार, लघवी चे विकार, कर्करोग, यकृत, मुळं त्यांचा काढा अनेक गुणकारी आहे. त्याच झाडाखाली पतीला ठेवणे आणि त्याचा जीव परत येणे यामागे आयुर्वेदिक योगायोग समजावा का?? आणि तो स्त्रीच्याच माथी आला असावा का??
पुरुषांनी का व्रत करू नये? असे वडपौर्णिमेचे व्रत करावे. तसे पुढच्या पिढीने करावे जसे वटपौर्णिमेला असते. त्याला फेऱ्या मारत आहे. पुरुषांनी बाभूळ किंवा बोरी बोरीचे झाड याला पूजाला हवे नाही का??? या प्रमाणात पर्यावरणाची होताना दिसत आहे . याबाबतीत कोणी मत दिले तर प्रसिद्धी या नावासाठी आणि त्यांनाही ही बाब खटकत आहे .जर बोलले तर म्हणतात धर्माविरुद्ध बोलतात, काही धर्मरक्षक आमच्या धर्मावर टीका करतात. पण शिक्षण क्षेत्रात विज्ञानाने ज्ञान घेऊन सुद्धा पर्यावरणाचे महत्त्व कळले नाही अजूनही ते दिसत नाही. झुगारून दे अघोरी प्रथा कधी नाही कळणार तुझ्या व्यथा त्याची पायमल्ली होताना दिसून येत आहे. महानगरपालिका, खेडे विभाग या सर्व ठिकाणी वटपौर्णिमेला वृक्षतोड करून गाड्या च्या गाड्या भरून वडाच्या फांद्या तोडल्या जातात आणि त्याची सर्रास विक्री केली जाते. पैसा कमावला जातो .अशा ह्या सुख सोयी आहेत त्यामुळे व्रत झपाट्याने पसरलेले दिसून येत आहे .
वड पौर्णिमा, मार्गशीर्ष गुरुवार, वैभव लक्ष्मी या व्रतासाठी वृक्षांच्या फांद्या तोडल्या जातात. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येते. गेल्या दशकामध्ये जास्तीत जास्त याला गती मिळाली आहे. होळीला सुद्धा एरंडाचे झाड तोडले जाते . दसऱ्याला सुद्धा आपट्याची पाने झाडे तोडली जातात. त्याची कत्तल होते. असे असंख्य वृक्षांची कत्तल होते. कत्तल करणे म्हणजे पर्यावरणाला उध्वस्त करणे आहे. असे या कर्मकांडात समाजातील लोक दुर्लक्ष करत आहेत ,त्यामुळे महाराष्ट्रातील नद्या या प्रदूषित होत आहे. याकडे कुणाचे लक्ष नाही वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
गाड्यांचा धूर , असंख्य प्रमाणाच्या वस्तू आहेत की त्यांचे प्रदूषण वाढले आणि त्यावर एक गंभीर बाब म्हणजे वृक्षतोड ही गोष्ट शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाला द्यायला हवी. आतापासून त्यांच्या मनामध्ये पर्यावरणाचे महत्त्व, वृक्ष लागवडीचे महत्त्व त्यांच्या मनात हा मुद्दा नमूद करायला हवा. लहानपणापासूनच त्यांच्या मनावर बिंबवायला हवे पण धर्मांतरीत लोक शिक्षण क्षेत्रात या बाबतीत दुर्लक्ष करतांना दिसत आहेत .
इथे एकाच जन्मांत 100 वर्षे मनुष्य जगू शकत नाही आणि सात जन्म कुठून आले??
आणि खरच सात जन्म आहेत का ,कुणी याचा प्रत्यय घेतला आहे का हे असंख्य प्रश्न स्त्री आणि पुरुषांना का पडत नसावे?? धर्मनिरपेक्षता हा भारतीय संविधानाचा मुलभुत पाया आहे, ध्येय आहे, खेदाची गोष्ट आहे ती पर्यावरणास सारखा संवेदनशील मुद्दा या बाबतीत प्रभावीपणे प्रबोधन कुठेच केलेले आढळून येत नाही . आणि जर केले तर त्याला प्रति उत्तर मिळत नाही. महाराष्ट्रात लोकांनी धर्मचिकित्सा, पर्यावरण चिकित्सा याचा ध्यास त्याचा विळा घेऊन अंमलबजावणी करणे आज काळाची गरज ठरली आहे .झाडाखाली निर्माल्या चा कचरा पडतो. झाडांना प्रचंड प्रमाणात दोरा गुंडाळला जातो, त्यांच्या फांद्या पूजनीय आहेत, झाडाचे नुकसान करून फांद्यांचे पूजन करणे कितपत योग्य आहे ?? संस्कृतीत निसर्ग,पर्यवेटन हा कृतज्ञतेचा विषय राहिला आहे. सध्या वातावरणात ही वाढ पर्जन्यवृष्टी, प्रदूषण सरोवर, तलाव, हे दूषित झाले आहे. वृक्षतोड झाली आहे ,जमिनीचा ऱ्हास होत आहे,नद्या-नाले फार कमी प्रमाणात आहे. त्यामुळे पाऊस सुद्धा कमी प्रमाणात पडतो जमिनीची धूप शांत होत नाही .
वृक्षतोड न करणे हा घराघरातून, गावागावातून वृक्षारोपण व्हायला हवे . या वडाच्या वड पौर्णिमा दिनी वृक्षारोपणाची जर मोहीम राबवली तर किती सुंदर काम होणार ??? या आधुनिक जगात या समस्या फार वाढलेल्या आहेत.
या समस्यांचा विचार केला तर प्रथमतः निसर्गाचाच विचार करायला हवा कारण निसर्गावर आपले आयुष्य ,आपले राहणीमान, आपला उदरनिर्वाह आहे निसर्गाचा समतोल राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे .
निसर्गाच्या या वृत्तीचा आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा वडाच्या फांद्या तोंडी यांवर सक्त कारवाई करण्याचा निर्णय दिला आहे. आणि ही फार उत्तम बाब आहे. पण तू बघूया यावर किती जण अंमलबजावणी करतात ते???
अनिता देशमुख
नांदुरा (बुलढाणा) ह. मू. कल्याण
Post Views: 283