प्रदीप खाडे यांची अकोला जिल्हा नॅब संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
17 Apr 2023, 6:13 PM
अकोला - नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड (नॅब) या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अकोला जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी विविध संघटनांचे पदाधिकारी असलेले जेष्ठ पत्रकार प्रदीप खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
या संघटनेत उपाध्यक्ष पदावर नेत्रतज्ञ डॉ नितीन उपाध्ये व राम शेगोकार यांची नियुक्ती करण्यात आली असून सचीव पदावर अँड. नितीन गवळी सहसचीव पदावर जयंतराव मसने व कोषाध्यक्ष पदावर अँड. अरुण सौदागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या सदस्य पदावर दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, जेष्ठ नेते विजय सारभूकन, अविनाश पाटील, नेत्रतज्ञ डॉ. श्रीराम लाहोळे, अँड. मंजुषा ढवळे हे कार्यरत अजून त्यांच्या मार्गदर्शना खाली संघटना कार्य करीत आहे. अंध सदस्य म्हणून अन्नपूर्णा गावंडे व वासुदेव चंदीवाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यवाहक म्हणून विनोद शेगोकार पदभार सांभाळीत आहेत.
सदर संघटनेच्या अकोला शाखेची निर्मिती १९८३ साली प्रकाश पोहरे यांनी केली होती. विद्यमान आमदार रणधिर सावरकर, डॉ. अविनाश पाटील माजी अध्यक्ष अदिती पोहरे आदींनीही या संघटनेच्या प्रगतीसाठी मोलाची कामगीरी बजावली आहे. आज या संघटनेचे अकोला जिल्हयात १८०० सदस्य कार्यरत आहेत.
अंध व्यक्तींसाठी संपूर्ण जगात : कार्यरत असणाऱ्या या नॅब संघटनेच्या भारता सह १२० देशात शाखा आहेत. प्रख्यात उद्योगपती निता अंबानी या संघटनेशी संलग्न आहेत. त्यांनी अंधासाठी एक वृत्तपत्र काढले असून त्याचे वाटप १२० देशांमध्ये होत आहे. कीर्तीचे प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्या लहाने यांनीही अकोला शाखेस भेट देवून स्तुती केली आहे. अकोला शाखेने दिव्यांगांसाठी मोतीबिंदु शिबीरे, शैक्षणिक साहित्य, क्रिडा साहित्य, मोबाईल, काठी वाटप आदी कार्यक्रम घेतलेले आहेत. अंधासाठी असलेले विदर्भातील सर्वात मोठे ग्रंथालय अकोला येथे असून स्थानिक श्री. शिवाजी महाविद्यालयात ते कार्यरत आहे.
Post Views: 103