व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी पंजाबराव वर
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
12 Apr 2023, 6:25 PM
अकोला : पत्रकारितेतील उज्वल कारकीर्द तथा सक्रीय काम पाहून अकोला जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पत्रकार, साहित्यिक तथा साप्ताहिक नारी ललकारचे संपादक पंजाबराव वर यांची व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि साप्ताहिक विभाग प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी केली आहे.
पंजाबराव वर हे अकोला जिल्ह्यामध्ये पत्रकारितेमध्ये गेल्या २५ वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी दैनिक विश्व शिवशक्ती, दैनिक लोकमत, समाज न्यायपत्र या वृत्तपत्रामध्ये उत्कृष्ठ असे काम केले आहे. तसेच विविध वृत्तपत्रामधून त्यांनी लेखन केलेले आहे व सध्याही करत आहेत. त्यांचे साप्ताहिक नारी ललकारचे ते मुख्य संपादक असून महिला विषयक त्यांचे साप्ताहिक महिलांकरीता काम करणारे आहे. पंजाबराव वर यांचे यापुर्वी त्यांचे माता रमाईचे गाथेच्या स्वरुपामध्ये महती सांगणारे ‘गाथा रमाईची’ जे की, माता रमाईचे नातू प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांचे हस्ते प्रकाशित झाले आहे. ‘महानायक बिरसा मुंडा’,
इंग्रजांना आंदोलनाच्या माध्यमातून सळो की पळो करून सोडणारे महान क्रांतीकारक असलेल्या आदीवासीचा मसिहा बिरसा मुंडा या पुस्तकाचे प्रकाशिन तत्कालीन शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
‘भ्रूण कन्येचा टाहो’ प्रातिनिधीक काव्यसंग्रह, ‘वर्हाडी झटका’ काव्यसंग्रह प्रकाशित असून त्यांनी महाराष्ट्रभरातील विविध वृत्तपत्रातून ते सतत लिखाण करीत असतात. तसेच सामाजिक कार्यात देखिल ते सतत कार्यरत असतात. त्यांना सामाजिक, तथा साहित्यीक कार्याबद्दल महाराष्ट्रभरातून ५० चे वर पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांचे नियुक्तीमुळे आर.एन.आई. अॅन्युअल रिपोर्ट सबमिट करणे बाबत शिबीर, तसेच आर.एन.आई. चे नवीन नियम यावर प्रशिक्षण मेळावे आयोजित करून अकोला जिल्ह्यातील साप्ताहिक संपादकांना, पत्रकारांना प्रशिक्षीत करू, असा विश्वास देखिल त्यांनी व्यक्त केला आहे. पंजाबराव वर यांची अकोला जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, साप्ताहिक विभाग प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, प्रदेश कार्याध्यक्ष गजानन धामणे, प्रदेश कार्याध्यक्ष राजु पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संतोष गाजरे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष नेमीनाथ जैन यांचे आभार मानले आहे. आपल्यावर जिल्हाध्यक्ष पदावर टाकलेली जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडण्याकरीता दिलेली असून ती माझीही जबाबदारी वाढली आहे व पत्रकार मित्रांकरीता जे काही कार्य करता येईल ते करण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास देखिल पंजाबराव वर यांनी आपल्या नियुक्ती प्रसंगी व्यक्त केला आहे. पत्रकार पंजाबराव वर यांची व्हाईस ऑफ मीडिया राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे समाज न्यायपत्राचे संपादक प्रा. मुकुंद भारसाकळे सर, संतोष धरमकर, फुलचंद मौर्य, संजय निकस पाटील, डी.जे. वानखडे, दिपक ताजणे, अॅड. एम.एस. इंगळे व सर्व स्थरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 128