कन्या कौशल्य शिबीर संपन्न


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Mar 2023, 9:42 AM
   

अकोला : अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुज हरिद्वार च्या तत्वावधानात लहान उमरी दीक्षित वाडी अकोला येथे  46 मुलींचे  एक दिवसीय कन्या कौशल्य शिबीर, पालक सभा, गायत्री दीप यज्ञ सोउत्साह संपन्न झाले
योग प्राणायाम, टी. टी. के. ताडासन, तिर्यक ताडासन, कटीचक्रासन, ओंकार साधना, उषापान सकाळी उठल्यावर तांब्याच्या गडव्यातून  पाणी पिणे, मुद्रा,आई, वडील, मोठ्यांचे चरण वंदन, गायत्री मंत्र जप साधना, गायत्री मंत्र लेखन,आई ला घरकामात मदत करणे,रोज नियमित सूर्य अर्ध्या देणे,परिवारात  एक वेळी सर्वानी सोबत बसून जेवण करणे, जीवनाला योग्य दिशा देणारे सदग्रंथ चे वाचन स्वाध्याय  एक पान इ गोष्टींचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक झाले गायत्री परिवार द्वारा निशुल्क एक दिवसीय कन्या कौशल्य आयोजित केले जात आहे. 

"बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी  संस्कारित करो" एक कन्या तीन कुळाचे  उद्धार करु शकते  शिक्षण, स्वास्थ्य, सुरक्षा, संस्कार, स्वावलंबन हे महिला सशक्तीकरण चे  मुल आधार स्तंभ आहे प्रत्येक परिवारात मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सहयोग अत्यंत जरुरीचे आहे. महिलेला समता द्वारे नाही  वरिष्ठता द्वारे  लाभांवीत करावे सुसंस्कारवान पीढी ला जन्म देणे सुसंस्कृत पीढी तयार करणे  त्या महिलेला सहज शक्य होणार जी  आजच्या  महिला जागरण महान अभ्युदय मध्ये आपले सहकार्य भागीदारी बनून  नवसृजन च्या कामात आपली भूमिका निभावण्यात आपले सहयोग देऊन विशिष्टतेचे परिचय देणार असे प्रतिपादन कन्या कौशल्य शिबीर  मार्गदर्शक यामीनी दीदी, रचना दीदी यांनी केला कन्या द्वारे आपले कला गुण अभिव्यक्ती सादर करण्यात आली सहभोजन डब्बा पार्टी करण्यात आली होती  गायत्री दीप यज्ञ सर्वानी  युग निर्माण सत्संकल्प का पाठ केले मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकास साठी पालकांनी संकल्प घेतले  शिबीरात  डॉ सुरेश राठी, डॉ अजय उपाध्याय, यामीनी दीदी, रचना काबरा, गायत्री देशमुख, अनुराधा देशमुख, कमलताई सोनकर यांनी मार्गदर्शन केले  कार्यक्रम सफल बनविण्यासाठी  प्रवीण बाळू देशमुख,शरदराव देशमुख, गुलाबराव देशमुख , आशाताई देशमुख, कोकिळा देशमुख, उषाबाई चोंडेकर,देवका काळे,अर्चना देशमुख, मंदाबाई, श्रुती चोंडेकर, श्रेया पुंडकर, अनुष्का कावळे, ऋतुजा जउळकार, गायत्री परिवार उमरी महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले.

    Post Views:  193


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व