एका विकृत नराधमाचा पाच वर्षीय मुलीवर अत्याचार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Dec 2022, 9:00 AM
   

पालघर -(संतोष घरत) : पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरात रविवारी दुपारच्या वेळेस एक धक्कादायक घडलेल्या घटनेने तेथील परिसर हादरून गेला असून, एका नराधमाने पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. बोईसर भागातील एका चाळीत बेकायदेशीर पणे राहणारा मुलाने हा निंदनीय प्रकार केला असून या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
बोईसर शहरातील एका माजी उपसरपंच यांच्या मालकीच्या चाळीत एक परप्रांतीय मुस्लिम २१ वर्षीय मुलाला बेकायदेशीर पणे चाळीतील घर भाड्याने देण्यात आले होते. रविवार दुपारच्या वेळी बाहेर खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलीला नराधमाने आपल्या घरात बळजबरीने आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे.ती पिडीत  मुलगी रडत -रडत आपल्या आई कडे गेल्यावर आईला हा धक्कादायक प्रकार समजला.यानंतर तातडीने बोईसर पोलिसांना कळविण्यात आले होते. बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा तातडीने तपास करून,आरोपीला बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले असुन पुढील तपास सुरू आहे. पिडीत मुलीला उपचारासाठी बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी हा उत्तरप्रदेश येथील मुळ रहिवासी असुन तो आज रविवार दि.4डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता आपल्या घरी जाणार होता. रेल्वेचे तिकीट त्यांच्या कडे आढळून आले असुन, नराधम आरोपी फरार होण्यापूर्वीच बोईसर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. महत्वाचे म्हणजे याभागात मोठ्या प्रमाणात अनेक जाती धर्माचे भाडोत्री राहत असुन याबाबत कोणत्याही प्रकारची कायदेशीर नोंद बोईसर पोलिस ठाण्यात आजवर दिलेली नाही.

    Post Views:  381


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख