रंगाबाद: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि वाद एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अधूनमधून काही विधाने करतात आणि त्यावरून वाद निर्माण होतो. त्यानंतर त्यांच्यावर सारवासारव करण्याचीही नामुष्की ओढवते. आता त्यांनी आज पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असं विधान करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादाला फोडणी दिली आहे.
Post Views: 239