मनोविचार विषयांअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून अकोला येथील प्रसिध्द मानसोपचारतज्ञ डॉ.सुजय पाटील यांचेकडून एका महत्वपूर्ण मार्गदर्शनपर कार्यक्रम कार्यक्रम संपन्न


 संजय देशमुख  2024-02-08
   

अकोला येथील आय.एम.ए सभागृहात आयोजित या कार्यक्रमात.... युवकांची मनस्थिती युवकांसमोरील आव्हाने प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाची जडणघडण यशाची गुरुकिल्ली व युवकांचे सामाजिक योगदान  या विषयावर जीवनातील यश आणि खरा आनंद काय असतो हा मुळ धागा पकडून आंतरराष्ट्रीय किर्तीच्या वक्त्यांनी मार्गदर्शन केले..




           यामध्ये मा.डॉ.हर्षवर्धन मालोकार, मा.डॉ.सौ.अनुराधा तोटे, मा.सचिन बुरघाटे, यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.






          डॉ.सुजय पाटील हे अकोल्यातील एक सेवाभावी वृत्तीचे एक समाजशील मानसोपचार तज्ञ असून शेतकऱ्यांसाठी आत्महत्याविरोधी अभियान चालविणारे ते संवेदनशील सेवाव्रती आहेत.त्यांच्या आयोजनामध्ये माजी गृहराज्यमंत्री मा.डॉ.रणजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत,मा.डॉ.गजानन नारे कार्यक्रमाचे अध्यक्ष तर डॉ.मा.दिपक मोरे व डॉ.मा.संदिप चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती.

    Post Views:  256


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व