शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस यांचे मानधनासाठी डॉ. रणजीत पाटील यांनी घेतली शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
15 Nov 2022, 6:53 PM
अकोला जिल्ह्यातील शालेय पोषण आहार चालू शैक्षणिक सत्रामधे बंद असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत असून उपस्थिती सुध्दा कमी होत आहे याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे जिल्हा अध्यक्ष श्री प्रकाश चतरकर यांनी तसेच जिल्ह्यातील अनेक स्वयंपाकी व मदतनीस यांनी अमरावती विभाग पदविधर मतदार संघाचे आमदार तथा माजी पालकमंत्री अकोला डॉ रणजीतजी पाटील यांना निवेदन देऊन पोषण आहार सूरू करावा व स्वयंपाकी , मदतनीस यांचे रखडलेले मानधन त्वरित अदा करावे अशी मागणी केली असता डाॅ. रणजीत पाटील यांनी त्वरित दखल घेऊन आज दिनांक १५/११/२०२२ ला मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री मा दिपकजी केसरकर यांची भेट घेऊन अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बंद असलेला शालेय पोषण आहार त्वरित सूरू करण्यात यावा तसेच शालेय पोषण आहार बंद असला तरी स्वयंपाकी व मदतनीस नियमित शाळेची साफसफाई व स्वच्छता ठेवत आहेत आज रोजी त्यांना पोषण आहार बंद आहे म्हणून मानधन देता येणार नाही असे आदेश देणे हे त्यांच्यावर अन्यायकारक असून त्यांच्या हक्काचे मानधन त्यांना मिळालेच पाहिजे अशी मागणी केली यावेळी त्वरित कार्यवाहीचे आदेश मंत्री महोदयांनी दिले
मा डॉ रणजीतजी पाटील यांच्या या कर्तव्यदक्षतेचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे वतीने सौ वंदना बोर्डे , विजय पाटील वाकोडे, गजानन काळे, संतोष झामरे, किशोर चतरकर, मोहम्मद वसिमोद्दीन,दत्तात्रय सोनोने, रूजिता खेतकर, सचिन काठोळे, नितीन बंडावार, श्याम कुलट, संतोष वाघमारे, देवेंद्र वाकचवरे, सुनिल माणिकराव, रामभाऊ मालोकार, अरूण वाघमारे, मुरलीधर कुलट, कमलसिंग राठोड, दयाराम बंड, विश्वास पोहरे, रामदास भोपत, संतोषराव इंगळे, चंद्रशेखर पेठे, राजेश मसने, ग.सु.ठाकरे,समाधान उमप रामदास वाघ,विजय धनाडे, सुरेश परमाळे, एहसान पठाण, दिनेश भटकर, संतोष रा. इंगळे,अनिल भाकरे, प्रशांत पुराणीक, रविंद्र आवारे, रविंद्र जाधव, बिपिन कुरई,अंजली मानकर, सुनिता कोथळकर, सुरेखा जोशी , जयश्री म्हैसने, सरिता सोळंके, ज्ञानेश्वरी दाळू,नरेंद्र इंगळे,रघुनाथ चव्हाण, गजानन गोतरकर,मनोज राठोड, अनंत मिसाळ, दिगंबर खडसे , सतिष खंडारे, निलिमा दांदळे, शिवशंकर अस्वार ,अमोल सराफ, विष्णू झामरे,अश्विन हिंगणकर, धर्मेंद्र चव्हाण ,रूपेश सुर्यवंशी ,गजानन शेवलकर ,अरूण भराडी, सुभाष ढोकणे,मनोज वाडकर, निलेश शेगोकार इत्यादींनी आभार मानले
Post Views: 184