ग्रामगीता घरोघरी पोहचवा - भानुदास कराळे


 संजय देशमुख  01 Dec 2021, 1:16 PM
   

अकोला : वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथाचे लेखन, व्यक्ती, परिवार समाज, राष्ट्र व विश्वाचे समस्यानिवारण, व्यसनमुक्त समाज, आदर्श परिवार सार्‍या गोष्टी चे समाधान लिहिले आहे. प्रत्येक घरोघरी ग्रामगीता स्थापना करून नियमित स्वाध्याय करणे जरुरी आहे. नियमित सामूहिक ध्यान व सामुदायिक प्रार्थना प्रत्येक गावी धार्मिक स्थळांची निर्मिती करणे गरजेचे आहे. ज्यांची परिवाराची  जबाबदारी कमी झाली त्यांनी जनमानसाच्या भावनात्मक नवनिर्माणासाठी आपला वेळ खर्च  करावा असे आवाहन अ.भा.गुरूदेव सेवामंडळाचे केंद्रीय कार्यकरिणीचे  सदस्य भानुदास कराळे यांनी गायत्री संस्कार केंद्र कृष्ण नगरी कौलखेड अकोला येथे केले.  मानाराम कांताबाई उपाध्याय यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते.  यावेळी डॉक्टर अजय उपाध्याय यांना ग्रामगीता भेट देण्यात आली. कार्यक्रमाला भीमरावजी लोखंडे, पुंडलिक रायकर, ज्ञानदेव मानकर, काशीराम लोखंडे, दयाराम बावणे, जिंदम खेडकर, संतोष वाडेकर अड. कोमल हरणे, डॉ. रामजी उपाध्ये उपाध्ये महाराज, पांडुरंग ओमकार, प्रणव ढोरे, गोपाळ रायकर, चंदू मालविय,शीतल सावळे, योगिता सातपुते, संध्या हरणे, रजनी उपाध्याय, शालिनी दीदी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन शुभम् वरणकार यांनी केले.

    Post Views:  202


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व