अंतिम श्वासापर्यंत समितीच्या माध्यमातून गुरूदेवांच्या प्रचार कार्याचा संकल्प


2022 च्या पंढरपूर यात्रेची 1 जानेवारीपासून नोंदणी
 संजय देशमुख  18 Dec 2021, 1:34 PM
   

अकोला : दरवर्षाची पंढरपूर यात्रा आणि समितीच्या माध्यमातून शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रसंतांच्या तत्वज्ञान प्रसाराचे कार्य करीत राहू, असा संकल्प अ. भा. गुरूदेव सेवा मंडळाच्या पंढरपूर यात्रा समितीने आपल्या प्रचार यात्रे दरम्यान केला आहे. 
पंढरपूर वारीच्या यात्रा समितीची स्थापना 20 जुलै 2017 रोजी पंढरपूर येथे 36 उपासकांच्या उपस्थितीत झाली होती. त्यानंतर 2018 च्या वारीमध्ये 111 उपासकांनी आपला सहभाग नोंदविला होता. कोरोना संसर्गामुळे 2020 व 2021 मध्ये वारीत खंड पडला होता. आता समितीला पाच वर्ष पूर्ण झाले असून परत एकदा वारी नियमित करून 1111 उपासकांची ही प्रचार यात्रा काढून मेळावा आयोजित करण्याचा संकल्प प्रचार समितीने केला आहे. दोन वर्ष पांडूरंगाचे दर्शन न झाल्याचे पुढील 2020 मधील नियोजनासाठी समिती प्रमुख लक्ष्मणराव गमे यांचे नेतृत्वाखाली समितीकडून तिन दिवसाच्या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या विचार मंथनात शेवटच्या श्वासापर्यंत प्रचार कार्य करीत राहण्याचा संकल्प करण्यात आला. विलासजी साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भानुदासजी कराळे यांचे नियोजनात काढण्यात आलेल्या प्रचार दौर्‍यात प्रा. रुपलालजी कावळे, काशिरामजी लोखंडे, प्रा. संजय गायकवाड, सखाराम मोहिते, डॉ. कैलास उगले, सौ. किर्तीमाला ढगे, विश्वासराव वालशिंगे, हरिभाऊ शिंदे, सुरेश ढगे, सुरेशजी ठाकरे सहभागी झाले होते. यावेळी वंदनिय महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी जागेची पाहणी, बुकस्टॉलला भेटी, पंढरपूर गुरूदेव उपासक भेटी, चर्चा सत्र, प्रचार यात्रे दरम्यान उपासकांच्या राहण्या संबंधी चर्चा, स्व.केशरबाई उगले यांना मौन श्रद्धांजली, असे या दौर्‍यातील कार्यक्रम होते. पुढील यात्रेत सहभागी होण्याकरीता सभासद नोंदणी 1 जानेवारीपासून सुरू करण्यात येईल, अशी माहिती नियोजन प्रमुख भानुदास कराळे यांनी दिली आहे. 

    Post Views:  399


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व