नांदुऱ्यातील जंगली महाराज स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Aug 2022, 9:50 AM
नांदुरा- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नांदुरा शहरातील श्री महादेव गौरक्षण संस्थान द्वारा संचालित श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे विविध उपक्रम घेण्यात आले,.
यामध्ये विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शिबिर,दंत तपासणी शिबिर,मुलींसाठी हेल्थ अँड हायजिन उपक्रम व त्यावर मार्गदर्शन,
त्यानंतर नांदुरा शहरातून वृक्षदिंडी व प्रभात फेरी,हर घर तिरंगा व एक मुलं एक झाड मोहिम उपक्रमांची जनजागृती,
सामूहिक राष्ट्रगान करीता कोठारी विद्यालयावर हजेरी,संपूर्ण विद्यालयाची स्वच्छता मोहिम,समूह गीत, देशभक्ती पर गित गायन स्पर्धा, वृक्ष वाटप, चित्रकला स्पर्धा,भाषण स्पर्धा व इतर अनेक उपक्रम राबविण्यात आले.
ह्या प्रसंगी शाळेचे व्यवस्थापन,श्री संत जंगली महाराज इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य विश्वास मापारी, विलास धोरण सर, प्रविन गिरी, शैलेश ठाकुर अमोल अवकाळे, पंकज गायकवाड, नितीन ढोले, विशाल ब्राम्हणे, शोएब खान,सौ. कविता मानकर ,सौ वनिता वडोदे, निकिता मांडवे,निकिता पांडव ,दिशा डवंगे, दिपाली वेरूळकर, मनीषा माळी ,देशांकी फेरन ,पूजा अवकाळे,पल्लवी लाहुडकर ,अर्चना साठे,कांचन बाठे ,धनश्री मलिक,प्रगती डंबेलकर,शितल हिवरखेडे ,पूजा गावंडे,सरदार,कल्पना खोद्रे ,अनिता इंगळ ,मानसी सपकाळ,ममता बावस्कार , सुवर्णा डंबेलकर,भिसे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 218