*स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सरेवाडीत उत्साहात साजरा*


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  16 Aug 2022, 7:15 PM
   

  जि प प्राथ शाळा सरेवाडी(नायफड) येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली.  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.दत्तात्रय शंकर ठोकळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे प्रतिज्ञा म्हणून झेंडा गीत म्हटले. तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांनी  झेंड्याचे व स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आपल्या भाषणात सांगितले. शालेय सर्व विद्यार्थ्यांना दप्तरे,लेखन साहित्य,गोष्टीची पुस्तके व खाऊ आदिवासी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री. अजय ठोकळ,सचिव मा.श्री.राकेश ठोकळ, उपाध्यक्ष मा.श्री.किसन वडेकर यांनी अतिदुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील विविध बाबींची अडसर दूर करण्यासाठी शैक्षणिक साहित्य दिले.अध्ययन अध्यापनातील उणिवा दूर करण्यासाठी सीपीयू, कीबोर्ड व माऊस देण्याचे मान्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री.पांडुरंग ठोकळ, मा.शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी केले. कार्यक्रमास श्री.एकनाथ ठोकळ, श्री.काळूराम ठोकळ, अंगणवाडीताई सौ.सुलाबाई ठोकळ, श्री.सचिन ठोकळ, ग्रामपंचायतीच्या मा.सरपंच व विद्यमान सदस्य मा.सौ. काळूबाई मेमाणे, मा. तंटामुक्तीचे अध्यक्ष मा.श्री.वामन माळी,
सौ.हिराबाई किसन ठोकळ समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
       केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री.भरतराव लोखंडे, गटशिक्षणाधिकारी मा.श्री.जीवनजी कोकणे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. सूत्रसंचालन श्री. विजयकुमार शेटे, श्री.बापूराव  दराडे यांनी आभार मानले आहे.

    Post Views:  160


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व