अकोला शहरातील सिंधी कॅम्प मधिल घरातील सिलेंडरचा स्फोट


भडक्यामधे संपुर्ण घर जळून राख
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  04 Apr 2022, 8:17 PM
   

अकोला : शहरातील सिंधी कॅम्प मधे घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. सिंधी कॅम्प परिसरातील महात्मा फुले नगर येथील किशोर भगत यांच्या घरातील सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. सिलेंडरच्या भडक्यामधे किशोर भगत यांचे घर संपुर्ण जळुन उध्वस्त झाले. आगीचा भडका येवढा भयंकर होता की त्यामध्ये घरातील सर्व वस्तू जळून राख झाल्या. घरामधील एलईडी टीव्ही, फ्रीज, कूलर, भांडीकुंडी संपूर्ण नष्ट झालीत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. किशोर भगत, त्यांची पत्नी व त्यांच्या तीन मुले असा परिवार या घरांमध्ये राहतो परंतु आज योगा-योगाने लग्नासाठी संपूर्ण कुटुंब सकाळीच बाहेर गावी निघून गेले होते, त्यामुळे "देव तारी त्याला कोण मारी" हिच म्हण येथे लागू पडते; कारण घरामध्ये कुणीच नसताना हा सिलेंडरचा स्फोट झाला चोवीस तास घरांमध्ये राहणारी मुले ही या आगीच्या भडक्यापासून सुदैवाने वाचली. परंतु घरातील संपूर्ण वस्तू व सामान जळून उध्वस्त झाले आहे. या मधे त्याचे आर्थीक नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले आहे. 

ही आग आग आटोक्यात आणली गेली असती परंतु याला अकोला प्रशासन जबाबदार आहे कारण येथील नागरिकांचे सांगने आहे की अमृत जल योजनेचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर खड्डे खोदून ठेवले आहेत, या कारणामुळे फायर ब्रिगेड ची गाडी आत मध्ये पोहोचू शकली नाही आणि आग आटोक्यात आणू शकली नाही. जर फायर ब्रिगेड ची गाडी गल्लीच्या आत मध्ये पोहोचली असती तर ही आग संपुष्टात आली असती, परंतु परिसरातील नागरिक जागरूक असल्यामुळे त्यांनी ताबडतोब जागेवरच पाणी टाकून ही आग विजवीण्याचा प्रयत्न केला व आजूबाजूचा परिसर आगीपासून सुरक्षित ठेवला आणि आग आटोक्यात आणली. आता तरी अकोला प्रशासनाला जाग येईल का? प्रलंबित कामामुळे कोणतीही जीवित हानी होऊ शकते याची जाण अकोला प्रश्नाला आता तर ईल का? असा येथील नागरिकांची प्रश्न आहे. लवकरात लवकर प्रलंबित कामे पूर्ण करावी, अशी मागणी येथील नागरिकांची व्यक्त केली आहे.

    Post Views:  340


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted