अकोला ः पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत विशेष पथकाने जनुना ते खिरकुंड दरम्यान अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली. आरोपी निशिकांत शेषराव रंगिरे २४, रा. अकोली जहांगीर हा मोटारसायक क्रमांक एमएच ३० एजी ८४८९ या वाहनाने अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्या जवळून प्रतिबंधिक गुटखा, मोबाईल व मोटारसायकलसह एकूण एक लाख चार हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.