अब्दुल मतीन अब्दुल गणी राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्काराने सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  20 Dec 2024, 9:12 AM
   

अकोला - शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल अब्दुल मतीन अब्दुल गनी  येथे आयोजित एका भव्य समारंभात राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आणि उर्दूच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी सक्रिय असलेल्या शिक्षकांच्या सेवेची दखल घेत राष्ट्रीय उर्दू कर्मचारी संघ त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करतात. या संदर्भात, २०२४ साठी देशातील विविध क्षेत्रांमधून820 अर्ज प्रयाक्त झाले होते तरी त्यामधून फक्त  60 सक्रिय आणि अनुकरणीय शिक्षकांची निवड करण्यात आली. ज्यामध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्हा मध्ये गुलाम झेनुल आबेदिन गुलाम मुस्तफा उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पारस तालुका बाळापूर जिल्हा अकोला चे उच्च श्रेणी सहा. शिक्षक अब्दुल मतीन अब्दुल गणी  यांचे ही नाव होते. या शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी मुंबई देशाची राजधानी  येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये संस्थेचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय उर्दू कर्मचारी संघाचे संस्थापक व अध्यक्ष  यांच्या हस्ते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.अब्दुल मतीन सर यांनी आपले सन्मानाचा श्रेय वडील अब्दुल गनी यांनी दिले आहे.

    Post Views:  7


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व