अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांकडून कारवाईला सुरुवात होताच, शरद पवारांना चेकमेट दिला आहे. शरद पवारांनी काही मिनिटांपूर्वीच पटेल आणि सुनिल तटकरे यांचे नाव पक्षाच्या नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. यावर तातडीने अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
पक्षामध्ये ठराविक काळाने निवडणुका व्हाव्या लागतात. त्या झाल्या नव्हत्या. यामुळे आम्ही काही नेत्यांना आम्ही जबाबदारी दिली होती. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी जयंत पाटील यांना दिली होती. आता कार्यकारी अध्यक्ष या नात्याने मी सुनिल तटकरे यांची निवड प्रदेशाध्यक्षपदी करत आहे. प्रतोद पद अनिल पाटील यांच्याकडेच राहणार आहे, असे पटेल म्हणाले. तर तटकरे यांनी अमोल मिटकरी - राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, रुपाली चाकणकर - राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष नेमल्याचे जाहीर केले आहे.
Post Views: 179