कान्हेरीचे योगेश सरप महाराष्ट्र महाऑरगॕनिकच्या संचालकपदी


 संजय देशमुख  21 Feb 2022, 8:15 PM
   

अकोला  : सेंद्रीय शेतीचा  प्रचार आणि प्रसार करणारे अनेक पुरस्काराने सन्मानित असलेले  कुषी भुषण गुरूदेवसेवक श्री  मधुकरराव सरप यांच्या कार्याचा वसा घेऊन शेतकरी मार्गदर्शन आणि घराघरात सेन्द्रीय अन्नधान्न्य भाज्या व ईतर उत्पादनं पोहचविणारे अकोल्याजवळील कान्हेरी सरप येथील प्रगतीशील शेतकरी पूत्र,गुरूदेवसेवक श्री  योगेश सरप यांची "महा ऑरगॅनिक अन्ड रेस्यूडयू फ्री फार्मर्स असोशिएन "(मोर्फा) च्या राज्य असोसिएशनच्या संचालक पदी निवड करण्यात आली. मोर्फाकडून झालेल्या राज्यस्तरिय मेळाव्यात संचालकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.त्यामध्ये योगेश सरप यांनाही हा बहूमान प्राप्त झाला आहे.
बारामतीमध्ये  खासदार श्री शरदचंद्रजी पवार  यांच्या अध्यक्षतेखाली व सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री श्री विक्रमसिंह पाटणकर तसेच बारामतीच्या अॕग्रीकल्चर डेव्हलपमेन्ट ट्रस्टचे चेअरमन श्री राजेंद्र दादा पवार , ‌राज्याचे आयुक्त श्री. धिरज कुमार मा.श्री दिलीपराव झेंडे  (संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण-कृषि आयुक्तालय, पुणे-महाराष्ट्र), .श्री ज्ञानेश्वर बोटे  (जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे) श्री बाळासाहेब तावरे (चेअरमन, माळेगाव सहकारी साखर कारखाना ली., शिवनगर), श्री पुरुषोत्तम जगताप (चेअरमन, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ली.),श्री विलास शिंदे (चेअरमन, सह्याद्री अॕग्रो-नाशिक), श्री सदाशिवबापू सातव (मा. नगराध्यक्ष, बारामती), श्री सुदाम आप्पा इंगळे(मा. जि. प. सदस्य, पुणे)
 यावेळी *राज्यातील नवनियुक्त  संचालक  पदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. अनेक अतिथींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने पार पडलेला हा
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री युगेंद्रदादा पवार (व्यवस्थापकीय संचालक, मोर्फा), श्री अंकुश पडवळे (अध्यक्ष, मोर्फा), सौ स्वाती शिंगाडे (उपाध्यक्ष, मोर्फा), श्री प्रल्हाद वरे (सचिव, मोर्फा), व मोर्फाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

    Post Views:  318


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व