राज्य तेली समाज समन्वय समितीच्या वतीने प्रमिलाताई ओक हॉल येथे आयोजित वधुवर परिचय मेळाव्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो व हा तर विज्ञानाचा स्विकार आहे व हे तेली समाजाचे मजबूत संघटन आहे असे प्रतिपादन राज्य तेली समाज समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाशदादा डवले केले .
राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळाला . ६०० पेक्षा जास्त बायोडाटा यापूर्वी प्राप्त झाले होते आणि काल सुद्धा बरेच बायोडाटा प्राप्त झाले .
सर्वप्रथम संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आयोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले त्यामध्ये प्रकाश डवले , प्रशांत शेवतकर , बालमुकुंद भिरड, रमेश गोतमारे ,सुधाकरराव झापर्डे ,किशोर लांजेवार ,गोपाल राऊत ,ललित भगत ,दिनेश साठवणे, मनोज साकरकार, राजेश पातळे ,देवेंद्र अडचुले ,विकास राठोड ,मदन भिरड ,केशव साकरकार ,देवेंद्र भिरड, संजय वानखडे, विजय वानखडे ,राजुभाऊ भिरड ,पूर्वेश साकरकार , ज्योती शेवतकर ,मृणाली डवले ,अनिता भिरड, सविता पातळे ,शितल भिरड ,विजया भिरड, मेघा साठवणे ,उषा गोतमारे ,प्रतिभा निवाने, प्रियंका राठोड ,अश्विनी अंबरते, विद्या धनभर, रश्मी अडचुले ,शिवानी नवथळे ,नीला साकरकार, पल्लवी चौधरी ,भावना वानखडे हे उपस्थित होते .
यावेळी डिजिटल स्क्रीनवर सर्व बायोडाटा दाखवण्यात आले व त्यांचे वाचन विकास राठोड यांनी केले . डिजिटल पुस्तक प्राप्त करण्यासाठी संपूर्ण माहिती देण्यात आली . राज्यभरातून उपस्थित उपवर मुला मुलींचा प्रत्यक्ष परिचय सुद्धा घेण्यात आला . कार्यक्रमाला राज्यभरातून समाज बांधव आले होते त्यांची लक्षणीय उपस्थिती अविस्मरणीय होती . जळगाव येथून आलेल्या चौधरी ताईंनी आपल्या भाषणात एवढा आधुनिक सोहळा व हायटेक तंत्रज्ञानाचा वापर मी बघितला नाही असे म्हणून या कार्यक्रमाची स्तुती केली . गोंदिया येथून आलेले एडवोकेट किशोर लांजेवार यांनी कार्यक्रमात तंत्रज्ञानाचा वापर व सभा न घेता कार्यक्रमाला उसळलेली गर्दी ही या कार्यक्रमाची क्वालिटी दर्शवते , असेच कार्य सर्व महानगरातील तेली समाजाने केले पाहिजे असे आवाहन केले . तेली समाजाच्या या मेळाव्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता . प्रशांत शेवतकर यांनी या मेळाव्यासाठी तीन महिने समाजसेवा म्हणून मी परिश्रम घेतो . राज्यभरातील समाज बांधवांशी संवाद साधतो व मेळाव्यात प्राप्त बायोडाटा इतरांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त लग्न जुळावित यासाठी प्रयत्न करतो हा आत्यानंद महत्वपूर्ण असतो . या कार्यक्रमाला नागपूरवरून सुभाष घाटे सुद्धा उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाला समाजाभिमुख कार्यक्रम असल्याचे शिक्कामोर्तब केले .
या मेळाव्यासाठी कोणतीही नोंदणी फी , जाहिरात किंवा अन्नदान शुल्क स्वीकारल्या गेले नाही शुद्ध समाजसेवेच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आला . कार्यक्रम स्थळी चहापाणी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती . सर्व समाज बांधवांना बायोडाटाच्या चारही पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचालन प्रशांत शेवतकर यांनी केले . आभार प्रदर्शन प्रकाश डवले यांनी केले .
Post Views: 217