एखादे अपयश हे आपलं भविष्य ठरवत नसते- अनिरूद्ध बक्षी


लोकस्वातंत्र्य पत्रकार पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा; गोवा राज्य प्रमुख नव्या नियुक्तीची माहिती
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 May 2025, 7:54 AM
   

सुचिता पाटेकर व अनिरूद्ध बक्षी यांचे हस्ते शालेय बॅगा व सन्मान चिन्ह देऊन गुणवंत विद्यार्थी गौरव व पदाधिकारी सन्मान
अकोला - आयुष्यातला एखादा पराभव किंवा अपयश हे भविष्य ठरवत नसते.हे समजण्याठी विद्यार्थ्यांची युवापिढी ही शैक्षणिक प्रगतीसोबतच भाषा,संवाद आणि सोशलमिडीयाच्या पलिकडे जाऊन मानसिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. असे वातावरण निर्माण करून त्यांना घडवणे ही पालक आणि समाजातल्या थोरा मोठ्यांची जबाबदारी आहे.असे महत्वपूर्ण प्रतिपादन बाळापूर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ४५ वा मासिक विचारमंथन मेळाव्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. याप्रसंगी लोकस्वातंत्र्य सभासदांच्या  १० वी  व १२ वी तील  गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथी सुचिताताई पाटेकर जिल्हा शिक्षणाधिकारी, माध्यमिक व एस.डी.ओ.बक्षी यांच्या हस्ते प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह व दर्जेदार शालेय बॅगा भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक प्रा.राजाभाऊ देशमुख व अकोला पंचायत समितीचे डॉ.उल्हास मोकळकर,विस्तार अधिकारी पंचायत हे प्रमुख अतिथी म्हणून तर लोक स्वातंत्र्यचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,उपाध्यक्ष प्रदिप खाडे यांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
      सर्वप्रथम लोकस्वातंत्र्य सामाजिक अधिष्ठाता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे महाराज यांना वंदन,अभिवादन करण्यात आले.शहिद जवान,अत्त्यारचारग्रस्त अश्विनी हगवणे व ईतर महिला, आत्महत्त्याग्रस्त शेतकरी, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, आपत्ती व अपघातातील बळी,व दिवंगत पत्रकारांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली. तनिष्क देशमुख,यदुराज काटे,ध्रूवेश देशमुख,ययांत देशमुख,सृष्टी लोडम,आकांक्षा अग्रवाल,आर्या देशमुख,धनश्री देशमुख,शरयु पागृत,कृष्णाई देशमुख, दृष्टी इंगोले, या व ईतर विद्यार्थ्या़ंना सन्मानित करण्यात आले.
  शिक्षणाधिकारी सुचिताताई पाटेकर यांनी लोकस्वातंत्र्यचे उपक्रम तथा पत्रकार व सामाजिक कल्याणाच्या वाटचालीचा गौरव केला.प्रज्ञावंतांच्या गुणगौरवाप्रमाणेच सामान्य उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी सुध्दा आनंददायी संकल्पना राबविण्याच्या अपेक्षा संघटनेकडून व्यक्त केल्या.संघटनाध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी समाज आणि पत्रकार कल्याणाच्या वर्तमान संघर्षाची आणि आगामी उपक्रमांची माहिती देऊन लोक स्वातंत्र्याच्या गोवा राज्य प्रमुख नियुक्तीची कल्पना याप्रसंगी दिली.सौ.सोनल अग्रवाल यांनी त्यांच्याविरूद्ध झालेल्या जादुटोणा षडयंत्र प्रकरणी व त्यांच्या दुसऱ्या सहकारी महिलेला कौटुंबिक छळवणूक घटनेत लोकस्वातंत्र्य कडून झालेल्या मदतीची माहिती दिली‌.  यावेळी उल्हास मोकळकर यांनी संघटन कार्य व वाटचालीची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्यात.
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या ४५ व्या मासिक विचारमंथन मेळाव्यात लोकस्वातंत्र्य सभासद पाल्य असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता‌.यावेळी मा.अनिरूध्दजी बक्षी,उपविभागीय अधिकारी महसूल विभाग,बाळापूर हे अध्यक्ष म्हणून तर मा.डॉ.सौ.सुचिताताई पाटेकर,जिल्हा शिक्षणाधिकारी,माध्यमिक,जि.प.अकोला व मा.डॉ. उल्हास मोकळकर,विस्तार अधिकारी,पंचायत,पं.स.अकोला हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.लोकस्वातंत्र्य संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष - या.संजय एम.देशमुख व राष्ट्रीय उपाध्यक्ष- मा.प्रदिप खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा दर्जेदार शालेय बॕग,प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. भावी यशासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात.
    प्रा.महादेव उर्फ देवबाबू लूले यांचे बहारदार संचलनाखाली झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख,युवा कादंबरीकार पुष्पराज गावंडे,अॕड.राजेश जाधव,सिध्देश्वर देशमुख,सौ.जया भारती इंगोले,संदिप देशमुख,अॕड.नितीन धुत,संदिप देशमुख,शंकरराव सांगळे,संतोष धरमकार,मनोहर मोहोड,अनिल मावळे,रमेश समुद्रे,सुरेश पाचकवडे,अंबादास तल्हार,जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष सागर लोडम,शशिकांतराव देशमुख,अॕड.कृष्णराव देशमुख,विजयराव बाहकर,सौ.जयमाला देशमुख, गजानन कावरे,गजानन ढवळे,आशिष काळे (चांदुर बाजार), के.व्ही.देशमुख,प्रा.विजयराव काटे,आशिष वानखडे पाटील,जयंत देशमुख,सुरेश भारती, मनोज देशमुख,गजानन मुऱ्हे,कृष्णा चव्हाण,डॉ.अशोक सिरसाट,संतोषकुमार गवई,दिपक शर्मा,सतिश देशमुख( विश्व प्रभात),दिलीप नवले,मनोज भगत ( हिवरखेड), धारेराव देशमुख,वसंतराव देशमुख,अशोककुमार पंड्या,नंदश्याम कुकडकर,अजय वाचनाकडे,गौरव देशमुख,कैलास टकोरे,अथर्व देशमुख, दिपक सिरसाट,संघपाल सिरसाठ,जगन्नाथ गव्हाचे, डॉ.अशोक तायडे,तुळशीराम झटाले,अर्जूनराव घुगे, व अनेक पत्रकार उपस्थित होते.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.आभारप्रदर्शन राष्ट्रीय पदाधिकारी सौ.जया भारती इंगोले यांनी केले.

    Post Views:  315


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व