अंकुर साहित्य संघाची वाढदिवस साजरा करण्याची परंपरा कौतुकास्पद - साहित्यिक आतिश सोसे


तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक संदीप देशमुख यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा
 विश्वप्रभात  21 Jun 2024, 5:57 PM
   

अकोला : अंकुर साहित्य संघ यांच्या वतीने आयोजित अंकुर साहित्य संघाचे विदर्भ अध्यक्ष श्री वासुदेव खोपडे तसेच माजी केंद्रीय प्रसिद्धीप्रमुख तथा तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवा साहित्यिक संदीप देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा तथा भव्य काव्य मैफिलीचे  आयोजन नुकतेच गणेश गार्डन कौलखेड येथील अंकुर साहित्य संघाच्या कार्यालयात नुकतेच  करण्यात आले.
         त्यावेळी बोलताना शुभम मराठी  साहित्य मंडळाचे संस्थापक,अध्यक्ष तथा प्रख्यात साहित्यिक आतिश सोसे म्हणाले की, अकोल्याच्या साहित्य क्षेत्रात नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचा काम गेल्या सात वर्षापासून तरुणाई फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप देशमुख हे सातत्याने करत आहेत अकोला जिल्हा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील साहित्यिकांचे संघटन केले असून त्यांच्या हातून अधिकाधिक साहित्य संमेलने पार पडावेत ह्या शुभेच्छा दिल्या वासुदेव खोपडे..यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे  विद्या बनाकर सत्कारमूर्ती वासुदेव खोपडे सत्कारमूर्ती संदीप देशमुख पुष्कराज गावंडे तुळशीराम बोबडे अंकुर साहित्य संघाचे हिम्मत ढाळे सदाभाऊ शेळके शिवलिंग काटेकर  आदींची विचार पिठावर उपस्थिती होती  दोन्ही सत्कार मूर्तीच्या विविध पैलू वर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या  त्यानंतर अंकुर साहित्य संघ शुभम साहित्य संघ  जन आंदोलन समिती  चव्हाण होमिओपॅथी क्लिनिक तसेच विविध संस्थेच्या वतीने  श्री संदीप देशमुख    व वासुदेव खोपडे यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज चावरे तर आभार प्रशांत भोडे यांनी मानले...   त्यानंतर काव्य मैफिल घेण्यात आली त्यामध्ये सुनील दिवानालें प्रभाकर दिवनलें गोदवारी  कलो रे सुनील लव्हाळे  राजेश काटोले  गजानन छबिले राजाभाऊ देशमुख राहुल भगत दीपक माहितकर अंबादास चांदुरकर मारुती नागोसे कांती क्षीरसागर   मोहन काळे शिवलीग काटेकर विष्णुपंत जोध संजय कावरे आदींनी आपल्याला कविता सादर केल्या.

    Post Views:  347


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व