तसनीम बोरींगवाला यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या विदर्भ महिला प्रमुखपदी नियुक्ती


 विश्व प्रभात  18 Nov 2026, 9:42 PM
   

अकोला  : अकोला येथील संवेदनशील, अभ्यासू आणि तळागाळातील नागरिकांसह महिलांच्या उन्नतीचा ध्यास घेऊन कार्य करणाऱ्या महिला व्यक्तिमत्त्व तसनीम बोरींगवाला यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या विदर्भ विभाग महिला प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अल्पसंख्याक मोर्चाचे राज्य प्रभारी राजेश पांडे आणि प्रदेश प्रमुख इद्रीसभाई मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अल्पसंख्याक महिला मोर्चाच्या प्रमुख प्रा. अस्मा शेख (पटेल) यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये तसनीम बोरींगवाला यांना विदर्भ महिला प्रमुखपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
अल्पसंख्याक समाजातील महिलांना संघटनात्मक कार्य आणि सामाजिक उपक्रमांमध्ये नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देत संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने विदर्भातील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
तसनीम बोरींगवाला या उच्चशिक्षित आणि सामाजिक कार्याची आवड असलेल्या युवा महिला आहेत. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिक, निराधार तसेच वंचित महिलांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत आहेत. विविध सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडत त्या शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना न्याय व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात.
त्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या सभासद आहेत. तसेच विदर्भ एकल महिला समिती, शिक्षण संघर्ष संघटना (उर्दू), दक्षता ,शांतता,सर्व धर्म समभाव समिती,ईनरव्हिल क्लब,राज्य रूग्णसेवा व श्रमिक कामगार संघटना,व मुस्लिम राष्ट्रीय मंच,अशा अनेक ठीकाणी  विविध पदावरून काम केलेले असून त्या महिलांच्या हक्कांसाठी लढतांना शासकीय योजना,रेशन कार्ड,अनुदाने आणि पेन्शन योजनांचे फॉर्म भरून अनेक महिलांना लाभ मिळवून दिलेले आहेत.त्यामुळे त्यांच्या सामाजिक प्रवाहात हजारो महिला त्यांच्या संपर्कात आहेत.त्या वेट लिफ्टर असून बॅडमिंटन,टेबल टेनिस अशा सहभागातून क्रिडा क्षेत्रातही त्यांनी विशेष नैपुण्य मिळविलेले आहे.मस्जिद व्यवस्थापनातही त्यांचा प्रमुख सहभाग आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्या भाजपमध्ये कार्यरत असून   भाजप अल्पसंख्याक महिला मोर्च्या मध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे.
    त्यांच्या या नियुक्तीचे समाजसेवी मित्र परिवार आणि महिला वर्गातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    Post Views:  5


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व