ग्रुप ऑफ मीडियाकडून सोशल मीडियाचा चांगला वापर : खासदार धैर्यशील माने
महाराष्ट्राचा महावक्ता बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
27 May 2022, 6:09 PM
आष्टा : घर बसल्या सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म बनला आहे. त्याचा उत्तम उपयोग ग्रुप ऑफ मीडियाने करून घेतला आहे. मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम आहे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
ग्रुप ऑफ मीडिया आयोजित महाराष्ट्राचा महावक्ता बक्षीस वितरण समारंभ तसेच राज्यस्तरीय सन्मान सोहळा आष्टा येथील जायंटस् हॉलमध्ये मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभवदादा शिंदे होते. यावेळी तहसीलदार धनश्री शंकरदास, जिल्हा नियोजन समिती सदस्य झुंजारराव पाटील, युवा उद्योजक संग्रामसिंह पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, माणिक शेळके,माजी उपनगराध्यक्ष विशालभाऊ शिंदे, धैर्यशील शिंदे,ज्येष्ठ नेते रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक अजित सिद, आष्टा पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, सिल्वर स्टार निधी बँकेचे चेअरमन नंदकिशोर आटुगडे, प्राचार्य सुभाष पाटील, माजी नगराध्यक्षा सौ. झीनत आत्तार, सौ लता पडळकर उपस्थित होत्या.
यावेळी येलूर गावचे सुपुत्र वारणा साखर कारखान्याचे संचालक संदीप जाधव यांना युवारत्न 2022 पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच आष्टा येथील माळी समाजाचे नेते महादेव माळी यांना समाजभूषण 2022 पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. करंजोशी येथील राजश्री शाहू अकॅडमीस आदर्श संस्था 2022 पुरस्कार देण्यात आला.
त्याचबरोबर जायंटस् ग्रुप चे अध्यक्ष समीर गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच कृषिरत्न पुरस्कार विजेते संजीव माने... कृषिभूषण पुरस्कार विजेते व कारंदवाडी येथील प्रगतशील शेतकरी सुरेश कबाडे, आष्ट्याचे सुनील माने यांनाही खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय महिला कायकिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल तांदूळवाडी येथील राजनंदिनी तानाजी पाटील हीचाही खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धा परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल सानिया आत्तार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचा महावक्ता स्पर्धेतील लहान गट तसेच खुल्या गटातील स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मुख्य संपादक पदी निवड झाल्याबद्दल सागर जगताप यांचा सत्कार खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आला. खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या मनोगतात ग्रुप ऑफ मीडिया च्या वाटचालीचे कौतुक करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभवदादा शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य झुंझारराव पाटील, युवा उद्योजक संग्रामसिंह पाटील, साखर कारखाना संचालक विराज शिंदे यांनी दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. स्वागत सागर जगताप यांनी केले. प्रास्ताविक आकांक्षा पाटील आणि गौतम माळी यांनी केले. आभार अश्विनी घोदे यांनी मानले. समूह प्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सृष्टी पाटील, सरदार कांबळे, सतीश पाटील, संतोष माने, अंबाणा माळी, आनंदा कांबळे, प्रकाश सादळे यांनी स्पर्धा तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
Post Views: 286