लोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजकल्याणाचं कार्य करणारी अग्रेसर संघटना-- प्रा.डॉ.मोहन खडसे


लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वाशीम जिल्हा कार्यकारिणीचे पदग्रहण
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  02 Nov 2026, 8:31 AM
   

⁠६२  वा विचारमंथन मेळाव्यात नियुक्तीपत्रे व ओळखपत्र,शालेय साहित्य वितरण 
स्व.नाना पाटेकर व ईतर बळींना श्रध्दांजली!
⁠ अकोला - जात,पात,धर्म,पंथ,भाषा अशा विविध भेदांना तिलांजली देऊन समाज आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी आक्रमक भुमिका घेऊन सर्वसमावेशक कार्याने वाटचाल करणारी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही महाराष्ट्रातील एक अग्रेसर संघटना ठरली आहे.सर्वांना एकत्र ठेऊन संघटन साधणे ही सोपी गोष्ट नाही.परंतू महाराष्ट्रात भरगच्च उपक्रम आणि कार्यक्रमांनी आपला परिचय सिध्द करीत ६ राज्यात प्रवेश करणाऱ्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने मात्र ही किमया करून दाखवलेली आहे. आज त्यांची युवा पत्रकारांची वाशीम जिल्हा कार्यकारिणी सुध्दा तयार झाली आहे.असे वास्तवतावादी प्रतिपादन अकोला येथील ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक व पत्रकारितेतील अभ्यासू व्यक्तिमत्व प्रा.डॉ.मोहन खडसे यांनी  केले. 
    लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा ६२ वा मासिक पत्रकार विचारमंथन मेळाव्यात सन्मान,मार्गदर्शन तथा नियुक्तीपत्र,आय कार्ड व शालेय साहित्य वितरण समारंभ नुकताच पार पडला.त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी वाशीम जिल्हाध्यक्ष प्रताप नागरे  यांचेसह सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे तर माजी प्राचार्य के.व्ही.देशमुख,लोकस्वातंत्र्य पदाधिकारी प्रा‌.डॉ.संतोष हुशे,संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी निरंतर शालेय साहित्य वितरण अभियानात गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करण्यात आले.हा खर्चाचा वैयक्तिक संकल्प अध्यक्ष संजय देशमुख यांचा होता.परंतू यानंतर डॉ.मोहन खडसे व के.व्ही.देशमुख यांनी पण सहभागाची तयारी दाखवली.वाशीम जिल्हाध्यक्ष प्रताप नागरे व नवनियुक्त वाशीम जिल्हा कार्यकारिणीतील प्रवीण पट्टेबहादुर (कार्याध्यक्ष) शिवशंकर भोयर (जिल्हा संघटन संपर्क प्रमुख) पंडीत उर्फ करण धोंगडे (उपाध्यक्ष) भागवत वाघ (उपाध्यक्ष) विनोद भालेराव (सचिव) प्रदीप सावले (कोषाध्यक्ष) शशिकांत जाधव (सहसचिव) विनोद रोकडे (सहसचिव) प्रदीप सालवणकर (सहसचिव) नेहा काळे (सदस्य) व बार्शिटाकळी तालूका अध्यक्ष म्हणून नियुक्त विकास काटे यांना नियुक्तीपत्र व त्यांचेसह ईतर सभासदांना आय कार्ड  वितरण करण्यात आले.
      याप्रसंगी सर्वप्रथम संघटनेचे अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना वंदन अभिवादन करण्यात आले. शहिद जवान व स्व.नाना पाटेकर,दिवंगत पत्रकार व विविध बळींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संघटना अध्यक्ष संजय देशमुख यांनी ५ वर्षानंतर संघटन कार्याची गती वाढली असून मुंबईत पण मोठा समुह तयार झाला आहे,आणि लवकरच २-३ जिल्हा कार्यकारिणी तयार होत आहेत असे सांगून नोव्हेंबरमध्ये ३० शिक्षकांच्या आयोजित  सन्मान समारंभाची माहिती दिली. ठाणेदार घुगे,प्रदिप खाडे, प्रा.डॉ.संतोष हुशे यांनी सुध्दा लोकस्वातंत्र्याची झपाट्याने झालेली नेत्रदिपक वाटचाल ही अत्यंत उल्लेखनिय असल्याचे सांगून शुभेच्छा व्यक्त केल्या.
     यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणीचे सचिव राजेंद्र देशमुख, पुष्पराज गावंडे,अंबादास तल्हार, संदिप देशमुख,अकोला जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर ,सागर लोडम, विजयराव बाहकर,सतिश देशमुख,मनोहर मोहोड,बुढन गाडेकर, विजय देशमुख,अनिल केळकर,प्रा.विजय काटे,आशिष वानखेडे पाटील,रमेश समुद्रे,श्रीकृष्ण माळी,दिलीप नवले,नितीन लोडम,तसनिम बोंरींगवाला,सौ.दिपाली बाहेर,कैलास टकोरे,सागर दनोरीकर,नारायणराव अंधारे,प्रेमराज शर्मा,दिपक शिरसाट,अमित इंगळे,प्रा.डॉ.बाळकृष्ण खंडारे,डी.जे.वानखडे,शिवचरण डोंगरे,सुवर्णसिंग खटोड,वसंतराव देशमुख,प्रा.डॉ.अशोक शिरसाट,संजयबाप्पू देशमुख, सुरेश तिडके,राजाभाऊ देशमुख,रविंद्र देशमुख,एकनाथ पाखरे,राजाभाऊ देशमुख,गजानन मुऱ्हे,कृष्णा चव्हाण, पि.एल.जामोदे, देवीदास घोरळ,गजानन थोरात,रामेश्वर अवातिरक,प्रसाद अवातिरक,अनिल वानखडे,भाऊराव वानखडे,संतोष बोर्डे,सागर बोर्डे,महादेव मुंडे, शुभम् मुंडे,,राजेश मुंडे,शेषराव तोंगडे, वाशीम व अकोला जिल्ह्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचलन सौ.दिपाली बाहेकर यांनी तर आभार प्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केले.

    Post Views:  10


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व