तुषार सायानी संशयास्पद अपघात प्रकरणाची चौकशी व्हावी!


लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे अकोला पोलिस अधिक्षकांना निवेदन
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  09 Oct 2026, 8:13 AM
   

अकोला - अकोला शहराबाहेर येवता टी पॉईन्टजवळील संशयास्पद अपघातात बळी गेलेल्या जठारपेठेतील तुषार रविंद्र सायानी या ३८ वर्षिय तरूणाच्या कुटूंबियांना दिलासा मिळावा.अपघात प्रकरणाची नि:पक्षपातीपणे सखोल चौकशी करून सायानी हतबल कुटूंबियांना न्याय द्यावा.अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांचेकडे करण्यात आली आहे.याप्रसंगी  पत्रकार महासंघाचे  संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रदिप खाडे,सचिव राजेंद्र देशमुख,अंबादास तल्हार व जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर व‌ बहूसंख्य पदाधिकारी व सभासदांची उपस्थिती होती.
      बळी गेलेला तुषार सायानी हा अकोला एम.आय‌.डी.सी. मधील स्वस्तिक इंडस्ट्रीजमध्ये सुपरवाझर म्हणून १ वर्षापासून काम करीत होता.दि.२० एप्रिल २०२६ रोजी इंडस्ट्रीज मध्ये आग लागल्यासंबंधी पांडे नामक मजूराचा रात्री १ वाजून २० मिनीटांनी त्याला फोन आला होता.यासाठी तो कर्तव्य म्हणून दुचाकीने जात असतांना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली होती.त्यांचे काही अवयव शरीरापासून वेगळे आणि छिन्नविछिन्न प्रेत पाहून हा फक्त अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्याचे वडील रविंद्र सायानी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत व्यक्त केलेला आहे.घटनेनंतर पोस्टमार्टम व थातूर मातूर चौकशी करण्यात आली.रात्रीचे वेळ होती आणि त्या ठीकाणी सी.सी.टी.व्ही नसल्याने वाहनांचा नंबर मिळू शकलेला नाही.अशी उत्तरे चौकशीतील पोलिसांनी सायानी कुटूंबियांना दिलेली आहेत.
    यासंबधी पोलिस अधिक्षकांशी चर्चा करतांना संघटना अध्यक्ष संजय देशमुख यांचेकडून घटनेला ४ महिने १३ दिवस झालेले असतांनाही वाहनांचा शोध लागत नाही.अधिक काळ गेल्यास मानवी सुगावे गायब होऊ शकतात.हा अपघातच आहे की खरोखर घातपात याबाबत साडेचार महिन्यातही निष्पन्न होत नाही म्हणजे तपासाची दिशा सदोष असल्याची शंका व्यक्त करण्यात आली‌.घटनेच्या ठीकाणी सी.सी.टी.व्ही नसला तरी काही अंतरावर तरी असलेच पाहिजे. ते तपासावेत आणि ज्याने बोलावले त्याची पण कडक चौकशी झाली पाहिजे.अशा अपेक्षा पोलिस अधिक्षकांकडे व्यक्त करण्यात आल्यात.त्यांनी यासंदर्भात योग्य चौकशी निश्चितच होईल असे आश्वासन दिले.जिल्हा पोलिस प्रशासनावर आमचा विश्वास असल्याने या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन लेव्हलकर यांचेशी याप्रकरणी चर्चा करण्यात आली.त्यांनीही साहनी कुटूंबियांना घटनेच्या चौकशीसह योग्य ती मदत करण्याची भुमिका व्यक्त केली.
     यावेळी सायानी  कुटूंबातील मृतकाचे वडील रविंद्र सायानी,विक्रम सायानी,राजेश सोड्डा,रसिकभाई कारिया,मनोहर मोहोड,बुढन गाडेकर,रमेश समुद्रे,संतोष मोरे,दिपक शिरसाट,अजय वानखडे,सागर दनोरीकर,नरेंद्र देशमुख,इर्शाद अहेमद,जमीर जे के,समीर खान, व अनेक पत्रकार उपस्थित होते.

    Post Views:  3


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व