प्रा. देवेंद्र देशमुख यांच्या भक्तीगीत गायन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद!


बारा ज्योतिर्लिंग मंदिरात भक्तीसुमनात रंगली \"भक्ती सुमने\" मैफल
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  08 Sep 2026, 8:13 AM
   

अकोला  :  श्रावण सोमवार  चे औचित्य साधून स्थानिक तरुणाई फाउंडेशन, कुटासा आणि स्वरांजली संगीत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  राऊतवाडी येथील श्री  बारा ज्योती लींग मंदिर परिसरात आयोजित ‘भक्ती सुमने’ या सांगीतिक अभंग मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रा. देवेंद्र देशमुख यांच्या ओजस्वी अभंगगायनाने संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला.
  वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय परंपरेला साजेशा या संगीत कला सांस्कृतिक कार्यक्रमात संत साहित्यावर आधारित विविध अभंग, भक्तिगीते आणि शिव नामाचा गजर सादर करण्यात आला. प्रा. देवेंद्र देशमुख यांनी सुमधुर आवाजात संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर शिव आदी संतांच्या अभंगांना सुरेल स्वरांत सादर करत उपस्थितांना भक्तिरसात तल्लीन केले.
महाेत्सवात  प्रा. देवेंद्र एन देशमुख यांनी भोळा भोला भंडारी  डम डम धमरू बाजे आदि गिते  सादर केली यांना ऑर्गनवर मनाेज राउत तर हार्माेनियमवर रवींद्र कसबेकर, तबला  भास्कर पाटील व अशाेक टावरी यांची साथसंगत लाभली. निवेदन डाॅ. प्रवीण देशमुख यांनी केले. विटे वरी उभा विठ्ठल. रखुमाई रखुमाई. देव माझा विठू सावळा.माऊली माऊली. चंद्र भागेच्या तीरी उभा मंदिरी पांडुरंग हरी अश्या अनेक भक्ती गीताने भक्ति रसात रसिक न्हाऊन  निघाले. भक्ती ना लट. आर्या कुलकर्णी  श्ररा नागलकर शुभा वानखडे अधी श्री सोळंके यश्री शेळके आदी  नी गिते सादर करून रसिकाची मने जिकली.
कार्यक्रमाला परिसरातील वारकरी, संगीतप्रेमी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठलभक्ती, अभंग परंपरा आणि सांगीतिक सादरीकरणाचा सुंदर संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमाने आषाढी एकादशीचा भक्तिमय आनंद द्विगुणित केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक तरुणाई फाउंडेशन,  स्वरांजली संगीत महाविद्यालय  तसेच  बारा ज्योती लींग मंदिर राऊत वाडी अकोला चे सर्व संचालक मंडळा ने अधक परिश्रम घेतले. उपस्थितांनी अशा सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

    Post Views:  9


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व