*पत्रकार आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी लोकस्वातंत्र्यचे हात बळकट करा*! प्रकाश अंधारे व मान्यवरांचे प्रतीपादन*
*शिक्षकांना पत्रकारिता करण्याची परवानगी देण्यासाठी मागणी*
*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या मुंबई मेळाव्यात विविध बळी व पद्मश्री , शिक्षणमहर्षी स्व.डॉ.डी.वाय.पाटील यांना श्रध्दांजली.*
*अकोला/मुंबई*--अनुचित घटनांचे वृत्तांचे प्रसारण करून प्रसिध्दी दिल्यामुळे अनैतिक प्रवृत्तींकडून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांनी व योजनांमधील आर्थिक लाभांपासून वंचित राहिल्याने पत्रकारांची प्रचंड कुचंबना होत आहे.त्यामुळे हतबल पत्रकार आणि अन्यायग्रस्त समाजाला न्याय देण्यासाठी पत्रकारांनी संघटीत व्हावे.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या योग्य नेर्तृत्वासोबत आपला वर्तमान आणि भविष्य सुरक्षित ठेवावा असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी, व प्रयोगशील शैक्षणिक सेवाव्रती प्रकाश अंधारे,अध्यक्ष संजय देशमुख व मान्यवरांनी केले. याप्रसंगी प्रवीण लाड,दै.नवशक्तीचे नितीन बोंबाळे,जगदिश प्रसाद करोतिया यांनी संघटनेच्या वाटचालीचा गौरव करून तिला सशक्त करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने पुढे येण्याचे आवाहन केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा मुंबई व कोकण विभागाचा १६ वा पत्रकार विचारमंथन, सन्मान,मार्गदर्शन तथा आय आय कार्ड वितरण समारंभ दादर येथील विदर्भ वैभव मंदिरात नुकताच संपन्न झाला.त्यावेळी हे अतिथी बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगे बाबा व महापुरूषांना वंदन अभिवादन करण्यात आले.देशातील शहिद जवान, आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,अत्याचारग्रस्त महिला बळी,दिवंगत पत्रकार,आपत्ती व अपघातग्रस्त बळी आणि माजी राज्यपाल,शिक्षणमहर्षी,पद्मश्री,स्व.डी.
वाय.पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.नवीन सभासदांना आय कार्डांचे वितरण करण्यात आले.सर्व अतिथींचा सन्मानचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. लोकस्वातंत्र्यची गरज लक्षात घेऊन संघटनेसाठी स्पिकर,माईकसह म्युझिक प्लेअर सेट भेट दिल्याबद्दल ज्येष्ठ पदाधिकारी संजय सोळंके,ठाणे यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विचारमंथनमध्ये समस्या जाणून घेतांना शिक्षणासोबतच चिंतन,मनन आणि जागृती व प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना पत्रकारिता करण्यासाठी शासनाकडून अडचण आणली जात आहे.हे निर्बध दुरू करून शिक्षकांना वेळात वेळ काढून पत्रकारितेचे छंद आणि कर्तव्य जोपासण्यासाठी परवानगी मिळाव्यात अशी मागणी या सभेत करण्यात आली.हा विषय शासनाकडे मांडला जाईल.असे आश्वासन माहिती अध्यक्ष संजय देशमुख यांनी दिले.याप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष प्रकाश अंधारे यांचेसह मुंबईतील शौर्य फाउंडेशनचे अध्यक्ष व शिवसेना (शिंदे गट) दापोली विधान सभा संपर्क प्रमुख प्रवीण लाड,उद्योजक व
समाजसेवी सुभाष कांबळी, हे प्रमुख अतिथी म्हणून तर लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर) राष्ट्रीय पदाधिकारी कादंबरीकार पुष्पराज गावंडे,कोकण प्रभारी जगदिश प्रसाद करोतिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला कोकण पदाधिकारी विनोद चाळके,महाराष्ट्र संघटन प्रमुख व मंत्रालयीन सचिव रफिक मुलानी,ठाणे जिल्हा संघटक संजय सोळंके,पालघर जिल्हा सचिव संतोष घरत जयप्रकाश जयस्वाल,देवेंद्र मेश्राम,नितीन बोंबाळे,उमेश चौधरी,अजय शिगवण,रविंद्र सर्णेकर,कमलेश कुबल,विकास भोसले,संदिप गोवेकर व अनेक पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन व आपल्या सहकाऱ्यांसह व्यवस्थापन विनोद चाळके यांनि केले तर आभारप्रदर्शन रफिक मुलानी यांनी केले.
Post Views: 1