अकोला पोलीस भरती १९८८ बॅच यांचा स्नेह मेळावा संपन्न


 विश्व प्रभात  23 Aug 2026, 9:39 AM
   


अकोला पोलीस भरती १९८८ बॅच चा स्नेह मेळावा चे आयोजन ओम मंगल कार्यालय अकोला येथे करण्यात आले होते. त्यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात बॅचचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक सन्माननीय तत्कालीन पोलीस अधीक्षक साहेब यांच्या विचार व कार्याला नतमस्तक व वंदन करून करण्यात आला.  कार्यक्रमांमध्ये विशेष सत्कार मूर्ती म्हणून तत्कालीन कवायत निदेशक/गुरुवर्य यांना निमंत्रित करण्यात आले होते. विचारपिठावर
मुख्य अतिथी तत्कालीन कवायत निदेशक श्री. गजानन इंगळे सर ( सेवानिवृत्त Dysp), सेवानिवृत्त Asi श्री रमेश पाटील सर 
तसेच  सेवानिवृत्त पीएसआय श्री श्रीकृष्ण डांगे,         एएसआय श्री. हमराज डोंगरे, एएसआय श्री. साहेबराव राठोड, एएसआय श्री अंबादास पवार ,श्री. प्रमोद ढोमणे असे  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त PSI श्री. सुरेश महल्ले यांनी केले. आणि प्रस्तावना Psi विजय खर्चे यांनी केली तसेच सेवाकाळ मध्ये मृत्यु झालेले पोलीस बांधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नियत वयोमानानुसार सेवेतून सेवानिवृत झालेबद्दल 
सेवानिवृत्त Psi श्री. राजेश गोमासे ,Psi श्री. सुनील वाघ , जीपीएसआय संतोष धारपवार यांचा उपस्थित गुरुवर्य यांचे हस्ते शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच Psi श्री. विजय खर्चे यांना १५/८/२०२० रोजी राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याबद्दल  त्यांचा उपस्थित गुरुवर्य श्री. पाटील सर आणि श्री . इंगळे सर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व पोलीस बांधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विशेष सत्कारमूर्ती म्हणून लाभलेले गुरुवर्य श्री गजानन इंगळे सर, श्री रमेश पाटील सर  यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमांमध्ये सेवानिवृत्त
एएसआय श्री अनिल खिल्लारे जीपीएसआय श्री धर्मराज नंदागवळी, तसेच सेवेत कार्यरत असलेले पीएसआय श्री जगदीश जायभाये यांनी आपले मनोगत व्यक्त करून मनोगतामध्ये आपल्या भूतकाळातील काही गोष्टींना उजाळा दिला व कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित करण्यात आल्याने आयोजकांची प्रशंसा करून अशाच प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी घेण्यात यावे जेणेकरून आपण सर्वजण एकत्र येऊन भेटून विचारांची देवाण-घेवाण करू शकतो असे सांगितले. सेवानिवृत्त एएसआय श्री. विदेश खांडेकर आणि एएसआय श्री. अनिल खिल्लारे यांनी उत्कृष्ठपणे गीत गायन केले. सदर कार्यक्रम करीता आयोजन समिती श्री विजय खर्चे, श्री सुरेश महल्ले, श्री समाधान जामनिक , श्री. बाबुराव लोखंडे, श्रीकृष्ण इंगळे,  श्री. जावेद खान, श्री गजानन उज्जैनकर, श्री दिनकर चौधरी यांनी कार्यक्रम 
करीता परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन आयोजन समितीचे श्री समाधान जामनिक यांनी केले. त्यानंतर उपस्थित गुरुवर्यंसह सर्व बॅचचे बांधवांचा  एकत्रित फोटो काढण्यात आले. उपस्थित सर्व बांधवांनी एकत्रपणे जेवणाचा आस्वाद घेऊन एकमेकांशी सुसंवाद साधत आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. सदर कार्यक्रम आनंद, हर्ष उल्हासात  अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आनंदात पार पडला.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व