हर घर तिरंगाः एल.आर.टी. च्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी रॅली द्वारे केली जनजागृती


 विश्व प्रभात  18 Aug 2026, 6:54 AM
   

अकोला 
दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला च्या एन.सी.सी. विभागाच्या कॅडेटस् ने "हर घर तिरंगा, घर घर तिरंगा" मोहिमेअंतर्गत शहरामध्ये जनजागृती रॅली काढून यामध्ये सहभाग घेतला. हर घर तिरंगा या मोहिमेमागील संकल्पना लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना बिंबवणे हा आहे. ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विकास शर्मा, ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल पंकज कुमार  यांच्या मार्गर्शनाखाली तसेच श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे व एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन डॉ. अनिल म. तिरकर याच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या रॅली द्वारे एन.सी.सी. कॅडेट्सनी भारताच्या राष्ट्रध्वजाचे महत्त्व लोकांना सांगितले. भारताचा राष्ट्रध्वज शांतता, प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे. भारताला स्वतंत्र करतांना अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राण गमावले, तिरंगा त्यांच्या अमूल्य बलिदानाचे प्रतिनिधित्व करतो. १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे पूर्ण होतील. या रॅलीचे आयोजन करतांना महाविद्यालयातील कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. वर्षा सुखदेवे, कॅप्टन डॉ. अनिल म. तिरकर, डॉ. आशालता रमण, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल, डॉ. ज्योती माहेश्वरी, डॉ. रतनलाल येऊल, डॉ. निलेश चोटिया, डॉ. हरीश बडवाईक, डॉ. स्वाती दामोदरे, डॉ. मोनिका साबू, डॉ. नागनाथ गुट्टे व इतर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅली नंतर सर्व एन.सी.सी. कॅडेट्सला भारतीय ध्वज देऊन आपल्या घरावर तो फडकावा असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कॅडेट्स आदित्य ताले, निखिल मौर्य, सुरज ठोसर, पियुष धांडे, धनराज जहिर, वेदांत वैराळे, शिवम वाघ, कृष्णा ठाकूर, आयुष कुलकर्णी, निखिल मोटवानी, अनिकेत गवळी, कृष्णा इंगोले, अथर्व देशमुख, कृष्णा भोसले, रुषभ खंदारे, आदेश मुळे, आदित्य मोटे, रौनक पारेवाले, हेमंत बुजबुले, सम्राट सुरुशे, दर्शन इंदाने, नाईक घोडे, दिव्या बावस्कर, जानवी पारस्कर, तृष्णा सिंग, प्रांजल लांडगे, तृप्ती कोरडे, कल्याणी सोनुले, ऐश्वर्या खंडागले, प्राजक्ता मोगरे, वैष्णवी बिचारे, गायत्री इंगळे, सानिका भरकर, वैष्णवी वानखडे, तृप्ती बुंदेले, किट्टू पटेल, तेजस्विनी बोदडे, वैष्णवी हरसुलकर, दीपिका वाघमारे, गुंजन खांडेकर, नियती खांडेकर, कोमल इंगळे, प्रांजल तायडे, प्रांजल फाटे, खुशी युके, अर्पिता जाधव, अर्पिता राठोड, कोमल गावंडे, प्रीती ठोसर, परनिका वाकोडे, कांचन सोळंके, आकांक्षा चव्हाण, श्रुती तिडके असे एकूण ८० एन.सी.सी. कॅडेटचा सहभाग लाभला. एन.सी.सी. कॅडेट्सनी राबविलेल्या या कार्यक्रमाबद्दल दि. बी.जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष अँड. मोतीसिंहजी मोहता, मानद सचिव डॉ. पवनजी माहेश्वरी, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इंजि. अभिजितजी परांजपे, सहसचिव अमितजी सुरेका व समस्त कार्यकारणी सदस्यांनी एन.सी.सी. कॅडेट चे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्यात.

    Post Views:  3


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व