वृध्दकलावंत योजनेचे होणारे सादरीकरण थांबवून मागील निवड याद्या पुर्ववत कराव्यात
पालकमंत्री, जिल्हाधिकारी तथा सी.ई.ओ, जि.प. अकोला यांना निवेदने
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Aug 2026, 9:07 AM
अकोला : जि.प. अंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलावंत योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने दि. ९ ते १२ ऑगस्ट २०२६ रोजी होणारे सादरीकरण थांबवून मागील निवड झालेल्या याद्या पूर्ववत करून त्यांना मानधन सुरु करण्याकरीता मा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी अकोला, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला यांना दि. ५.८.२०२६ रोजी कलावंत समितीतर्पेâ निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, मागील वर्षी २०२३-२०२४ ची यादी पंचायत समिती येथे बीडीओ व कलावंत समिती यांचे समक्ष सादरीकरण करून तयार करण्यात आलीr. त्या यादीतील कलावंतांना मानधन सुरु करणे गरजेचे होते परंतू असे झाले नाही. निवड समितीतील काही सदस्यांनी भ्रष्टाचार करून नवीन लोकांची नावे यादीत जोडली आहेत. त्यामुळे मागील वर्षाच्या यादीवर अर्थात २०२३-२०२४ च्या कलावंतावर हा घोर अन्याय आहे. तसेच मागील यादीतील काही सदस्यांचे मृत्यू सुद्धा झालेले आहे, काही वृद्ध कलावंत आहेत, या सर्व वृद्ध कलावंतावर हा अन्याय आहे. मागील यादी पुर्ववत करून त्यांना मानधन सुरु करण्यात याव अन्यथा जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेतर्पेâ देण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ कलावंत अर्जून घुगे बंधू, राजू जयाजी जाधव, मधु कसबे, डी.जे. वानखडे, पंजाबराव वर, दिलीप दांदळे, प्रजानंद उपर्वट, टी.एस. तेलगोटे, रमेश वानखडे, रमेश समुद्रे, डॉ. धनंजय नालट यांनी निवेदन दिले.
Post Views: 15