पुणे विद्यापिठ हायस्कूल मध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2026-08-06
   

विष्णू मोरे...जि.प्र.पुणे
पुणे--- महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल* मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे  यांच्या जयंती निमित्त शालेय मंत्रिमंडळ निवडणूक घेण्यात आली.  यावेळी विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची ओळख व्हावी व त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण, जबाबदारीची जाणीव आणि संघभावना रुजावी यासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. लोकशाही अधिक सक्षम व्हावी.लोकशाही संस्काराचा सुंदर आविष्कार अनुभवता यावा, निवडणूक प्रक्रिया समजावी यासाठी निवडणूक घेण्यात आली. उमेदवारी अर्ज मागवण्यापासून ते निकाल लागेपर्यंतच्या सर्व बाबी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवता आल्या. उमेदवारी अर्ज मागविणे, अर्जाची छाननी करणे, वर्गवार प्रचार करणे, मतपत्रिका छापणे, गुप्त पद्धतीने मतदान करणे, बोटाला शाई लावणे या सर्व प्रक्रियांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह व माजी मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी राज्यपाल  सोनाली घोडके हिला शपथ दिली. मुख्यमंत्री आदित्य गटकळ, उपमुख्यमंत्री  जागृती मोरे व विविध खात्यांचे मंत्री यांनाही याप्रसंगी शपथ देण्यात आली.         यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक  संताजी चव्हाण, राजेंद्र पाटेकर, वैशाली सैंधाणे, योगेश्वर चव्हाण, मनोहर निकम, तेजस्विनी निरगुडे, संध्या आवेकर, रेश्मा पुरी, पल्लवी अभंग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Post Views:  17


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व