महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
06 Aug 2026, 10:35 AM
जळगाव : महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन व जळगाव जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७* दि. *२५ व २६ जुलै २०२६* रोजी *कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील जलतरण तलावात* उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील *१९० खेळाडूंनी* या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन *श्री. सुभाष एस. पवार*, उपाध्यक्ष, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी टी-२० क्रिकेट टूर्नामेंट बोर्ड, दिल्ली यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती करण्याचे आवाहन केले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिकांचे वितरण *श्री. सागर शिंपी, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्थानक, जळगाव, **श्री. दयानंद कुमार, अध्यक्ष, महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन, **श्री. राजेंद्र निंबाळते, सचिव, महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशन तसेच **श्री. राजेंद्र ओक*, अध्यक्ष, जळगाव जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशन यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेदरम्यान *राष्ट्रीय ट्रायथलॉन अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड चाचणी* देखील घेण्यात आली. निवड झालेल्या खेळाडूंचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी *जळगाव जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशनचे सचिव श्री. कमलेश नगरकर, तसेच **श्री. अभय देशमुख, श्री. बालाजी केंद्रे, श्री. यज्ञेश बागराव, श्रीमती रूपाली रेपाळे, श्री. प्रमोद परसी आणि श्री. राजीव जाधव* यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरित्या पार पडली. राज्यातील गुणवंत खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
Post Views: 6