*श्री संत गाडगे महाराज भव्य स्मारक निर्माण व मराठी शुभविवाह डाॅट काॅम लोकार्पण सोहळा विदर्भ रत्न हभप संजय महाराज पाचपोर शुभहस्ते संपन्न*
मुंबई - विदर्भ वैभव मंदिर, मुंबई व विदर्भ समाज संघ, मुंबई यांच्या वतीने श्री संत गाडगे महाराज यांचे भव्य स्मारक बाबांच्या जन्म गावी शेंडगाव अमरावती येथे उभारणीसाठी जनजागृती तसेच वैदर्भीय बांधवांसाठी "मराठी शुभविवाह डॉट कॉम" या विवाह नोंदणी संकेतस्थळाच्या लोकार्पणाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमास विदर्भरत्न, गोपालक रामायणाचार्य ह.भ.प. श्री संजय महाराज पाचपोर, प्रख्यात उद्योगपती व संस्थेचे विश्वस्त श्री संजय हावरे अध्यक्ष श्री अशोकराव बारब्दे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमास मुंबईसह परिसरातील असंख्य वैदर्भीय बांधव, श्री संत गाडगे महाराजांचे अनुयायी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व समाजातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी श्री संत गाडगे महाराज स्मारक समिती ट्रस्टचे अध्यक्ष श्री श्रीधर नाईक, गटनेते नगरसेवक श्री प्रदीप मलविये, श्री अनंत गावंडे, श्री सुनील खराटे, ठाणे नगरसेविका सौ. माधुरी मेंटागे, मुंबई माजी नगरसेवक श्री प्रकाश अहिरे, ॲड. राहुल रणपिसे, ॲड. विजय ठाकरे, सौ. अरुणा गावंडे पत्रकार श्री विवेकानंद पाटील, गाडगेबाबा चे प्रचारक अनिलकुमार मेश्राम संघाचे श्री शिवशंकर हिंगणे, श्री सुजित कुंभारकर, विदर्भ वैभव मंदिरचे विश्वस्त श्री राजाभाऊ चौधरी, श्री लक्ष्मण तायडे, ॲड. नवनित भोजणे, श्री संजीव बारब्दे, श्री विजय खोत तसेच विदर्भ समाज संघाचे पदाधिकारी श्री प्रमोद तळोकार, श्री प्रभाकर आडेकर, श्री राजेंद्र हटवार, श्री अविनाश गावंडे, श्री गजानन गावंडे, श्री नंदकिशोर चव्हाण, सौ. मंदाकिनी भावे, श्री संजय जायभाये, प्रकाश ढवळे, गाडगेबाबा धर्मशाळेचे श्री एकनाथ ठाकूर, श्री अमोल ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. दादर शिवाजी पार्क पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विलास दातीर साहेब यांचीही कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विदर्भ वैभव मंदिर चे सरचिटणीस श्री गजानन नागे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी ह.भ.प. श्री संजय रावजी पाचपोर महाराज यांनी श्री संत गाडगेबाबा यांचे भव्य स्मारक उभारण्याचा घेतलेला संकल्प सर्वांसमोर मांडला. या स्मारकाच्या उभारणीसाठी २५ कोटी चा निधी लोक वर्गणीनितुन गोळा करून अतिशय सुंदर दगडी मार्बल मघे स्मारक ५ एकर जागेवर गाडगे महाराज यांच्या चल व अचल दशसुत्री संदेश निर्माण उभारण्यात येणार आहे. यासाठी कोकर्डा चे श्रीधर नाईक यांनी जमीन दिली आहे व अनेक दात्यानी भरिव मदत जाहीर केली आहे, मुंबई विभागातून ५ कोटी रुपये निधी लोक वर्गणीनितुन गोळा करून देण्यात येणार आहे, यासाठी विदर्भ वैभव मंदिर, व विदर्भ समाज संघ, श्री गाडगे महाराज धर्मशाळा मुंबई, श्री गाडगे महाराज विचार मंच, मुंबई परिट समाजातील अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत, हभप श्री संजय महाराज पाचपोर यांचे आव्हानांना प्रतिसाद अनेक दात्यानी भरिव देणगी देण्याचे जाहीर केले आहे.
या पवित्र व ऐतिहासिक कार्यासाठी सर्व समाजबांधवांना नम्र आवाहन करण्यात येते की, श्री संत गाडगेबाबा यांच्या भव्य स्मारक त्यांचे शेंडगाव जन्मस्थळ उभारणीसाठी आपण "फूल नाही तर फुलाची पाकळी" या भावनेतून भरिव शक्य ती आर्थिक मदत किंवा बांधकाम वास्तुरूपात मदत करून या कार्यात आपला सहभाग नोंदवावा. तसेच या कार्यक्रमात वैदर्भीय मुंबई बांधवांकरिता मराठी शुभविवाह डाॅट काॅम विवाह नोंदणी वेबसाइट लोकार्पण करण्यात आली आहे सर्व समाजातील बांधवांनी वेबसाईट चा लाभ घ्यावा असे आवाहन गजानन नागे यांनी केले आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदार मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व उपस्थित बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले.
Post Views: 37