अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलनात आकर्षण ठरली ग्रंथदिंडी!


जिल्ह्यातील साहित्यिकांनी फुगडी घालून साजरा केला आनंद !
 विश्व प्रभात  27 Nov 2025, 9:57 PM
   

अकोला, तरुणाई फाउंडेशन कुटासा तालुका अकोट जिल्हा अकोला व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई   मंडळ,मराठी भाषा विभाग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  सातवे अकोला जिल्हा मराठी साहित्य संमेलन नुकतेच वसंत सभागृह श्री शिवाजी महाविद्यालय  अकोला येथे पार पडले  त्यात मुख्य आकर्षण ठरली ती ग्रंथदिंडी. पारंपारिक वेशभूषा करून अभंग टाळ मृदुंग गजरात वारकरी  मुले ग्रंथ दिंडीचे  मुख्य आकर्षण ठरले. भगव्या कलरचे आकर्षण रंगाचे फेटे बांधून वेशभूषा परिधान करणारे वासुदेव ग्रंथदिंडीतील चित्तवेधक दृश्य होते.ही ग्रंथ दिंडी देशमुख फाईलमधील गजानन महाराज मंदिरापासून तर  शिवाजी महाविद्यालयातील   वसंत सुभागृहापर्यंत काढण्यात आली. हरिनामाच्या गजरात साहित्यिकांनी फुगडी खेळत  दिंडीचा  मनमुराद आनंद लुटला. साने गुरुजी कला संस्कृती मंडळ पातूरच्या चमुने  दिंडीमध्ये  आपला सहभाग नोंदवून वासुदेव  आदी वेशभूषा करून ग्रंथ दिंडीचे  आकर्षण वाढवले.जिल्ह्यातील साहित्यिकांनी या ग्रंथ दिंडीचा आनंद लुटला. त्यात प्रामुख्याने अभिनेता  कुणाल मेश्राम  संमेलनाध्यक्ष सु. पु. अढाऊकर,स्वागताध्यक्ष संजय एम.  देशमुख, पुष्पराज गावंडे, महादेव लुले  गजानन छबिले,मोहन काळे,वासुदेव खोपडे तुळशीराम बोबडे,शिवलिंग काटेकर. तरुणाईचे संस्थापक अध्यक्ष संदीप देशमुख विकास पल्हाडे,देवानंद गावंडे, गणेश मेणकर,डॉ. किरण वाघमारे,विनायक भारंबे, आबासाहेब कडू,शंकर धोंडसे, दिवाकर देशमुख,राजेंद्र देशमुख,अंबादास तल्हार दिलीप नवले, डॉ. विनय दांदळे, विशाल राखोंडे,सागर राखोंडे, विनायक विनायक पांडे   आदीची उपस्थिती होती.

    Post Views:  51


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व